तुम्हाला माहीत असायलाच हव्यात अशा टॉप १५ सरकारी योजना | एसबीआय लाईफ
भारतातील शीर्ष १० सरकारी योजनांची यादी ज्या तुम्हाला माहित असाव्यात
जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारत सरकारने, देशातील जास्तीत जास्त नागरिकांना लाभ पोहोचवण्यासाठी अनेक सरकारी योजना आणि उपक्रम आखून त्यांची अंमलबजावणी केली आहे. यापैकी अनेक योजना मोठ्या संख्येने लोकांचे परमहित साधण्यात यशस्वी ठरल्या आहेत. सरकारी योजनांची ही यादी अलीकडील वर्षांत हाती घेण्यात आलेल्या काही अत्यंत प्रभावी उपक्रमांवर प्रकाश टाकते. चला त्यांच्यावर एक नजर टाकूया.
बेटी बचाओ बेटी पढाओ –
भारतीय समाजात पूर्वापार चालत आलेल्या, जी मुलीला शिक्षणाच्या मूलभूत हक्कापासून वंचित ठेवते, अशा गैरसमजाचे निर्मूलन करण्यासाठी भारत सरकारने काही प्रयत्न केले आहेत. हा एक असा कार्यक्रम आहे, ज्याचे उद्दिष्ट देशातील वंचित घटकांमध्ये जागृती निर्माण करणे हे आहे, विशेषतः जेणेकरून ते आपल्या मुलींना वाढण्यास आणि शिकण्यास मदत करू शकतील; आणि त्याद्वारे देशाच्या तसेच स्वतःच्याही उज्ज्वल भविष्याची जडणघडण करू शकतील.
आयुष्मान भारत योजना –
सरकारच्या या योजनेचा उद्देश देशातील सुमारे दहा कोटी गरीब आणि शोषित वर्गांना आरोग्य मदत प्रदान करणे आहे. देशातील गरिबांना आणि त्यांच्या कुटुंबांना चांगले जीवनमान प्रदान करणे हा या योजनेचा उद्देश आहे.
स्वच्छ भारत –
या कार्यक्रमाचा उद्देश लोकांना त्यांचा परिसर स्वच्छ ठेवण्याच्या मूलभूत गोष्टी समजून घेणे आणि शिकवणे हा आहे. राष्ट्रीय नेत्यांनी योग्यरीत्या हे निदर्शनास आणून दिले आहे, की केवळ स्वच्छ राष्ट्रच येणाऱ्या काळात प्रगतीशील भविष्याकडे वाटचाल करू शकते.
गोबर धन योजना –
या योजनेच्या निर्मात्यांनुसार, मानवांचा आणि प्राण्यांचा संकलित घनकचरा वापरून ऊर्जा व इंधन निर्माण करता येते, ज्याचा उपयोग विविध उद्देशांसाठी केला जाऊ शकतो. हा एक असा कार्यक्रम आहे, जो स्वच्छ भारत योजनेशी सुसंगत आहे आणि ज्याचे उद्दिष्ट शेतांमध्ये तसेच इतर उघड्या जागांवर उघड्यावर शौच करणे रोखणे हे आहे.
सौर चरखा अभियान –
देशातील लहान कारागीर आणि हस्तकलाकारांमध्ये प्रचंड आर्थिक क्षमता आहे, हे देशातील राष्ट्रीय नेत्यांनी त्वरित ओळखले. म्हणूनच, मध्यम आणि लघु उद्योगांच्या योजनेअंतर्गत, ईशान्येकडील कारागिरांना विशेष मदत देण्यात आली आहे.
राष्ट्रीय बांबू अभियान –
बांबू उत्पादन उद्योग आणि त्याला संलग्न असलेले विविध उद्योग, भविष्यातील आर्थिक विकासासाठी जतन करता यावेत, या उद्देशाने भरीव आर्थिक मदत पुरवण्यात आली.
प्रधानमंत्री आवास योजना –
या योजनेअंतर्गत, सरकारने २०२२ च्या अखेरीस सर्व गरीब आणि बेघरांना त्यांचे स्वतःचे घर देण्याचे उद्दिष्ट ठेवले होते.
आकांक्षी जिल्ह्यांचे परिवर्तन कार्यक्रम –
हा सरकारचा एक असा कार्यक्रम आहे, ज्याच्या माध्यमातून देशातील ग्रामीण आणि मागास प्रदेशांचा व जिल्ह्यांचा विकास करता येईल आणि त्यांना देशातील इतर शहरी केंद्रांशी अधिक चांगल्या प्रकारे जोडता येईल. रस्ते आणि दळणवळण व्यवस्था सुधारणे ही येथे एक प्रमुख चिंता आहे.
ऑपरेशन ग्रीन -
देशातील शेतकरी आणि मशागत करणाऱ्या वर्गाला अलीकडच्या काळात सोसाव्या लागलेल्या अडचणींची दखल घेऊन, संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत पुरवण्यासाठी सरकारने हा कार्यक्रम सुरू केला आहे. यामुळे कांदे आणि बटाटे यांसारख्या जीवनावश्यक अन्नपदार्थांच्या चढ-उतारांच्या किमती नियंत्रित करण्यातही मदत होऊ शकते.
प्रधानमंत्री जन धन योजना –
हा एक असा कार्यक्रम आहे, ज्याचा उद्देश मूलभूत आर्थिक व्यवहार आणि बचत प्रत्येकासाठी एक सोपा आणि सुलभ पर्याय बनवणे आहे.
भारत सरकारच्या योजनांच्या यादीत अशा आणखी अनेक योजना आहेत. सर्व सरकारी योजनांची अंमलबजावणी आणि प्रत्यक्ष कार्यवाही होण्यास कदाचित काही अवधी लागू शकेल; परंतु, देशासाठी आणि येथील जनतेसाठी एका उज्ज्वल भविष्याची जी दृष्टी आहे, तीच या प्रमुख सरकारी योजनांना दिशा देणारी एक प्रेरक शक्ती ठरते.