मायक्रो टर्म अ‍ॅश्युरन्स प्लॅन | एसबीआय लाइफ - ग्रुप मायक्रो शील्ड
close

By pursuing your navigation on our website, you allow us to place cookies on your device. These cookies are set in order to secure your browsing, improve your user experience and enable us to compile statistics  For further information, please view our "privacy policy"

SBI Logo

Join Us

Tool Free 1800 22 9090

एसबीआय लाइफ – ग्रुप मायक्रो शील्ड

UIN: 111N138V01

एसबीआय लाइफ – ग्रुप मायक्रो शील्ड

संरक्षण झाले
प्रत्येकासाठी सोपे

एक ग्रुप, नॉन-लिंक्ड, नॉन-पार्टिसिपेटिंग प्युअर रिस्क प्रीमियम, वन इयर रीन्युवेबल मायक्रो लाइफ इन्शुरन्स प्रॉडक्ट


तुमच्या ग्रुपच्या सदस्यांना किफायतशीर प्रीमियममध्ये लाइफ इन्शुरन्सचे संरक्षण देण्याची तुमची मनोमन इच्छा आहे का?


तसे असेल तर, एसबीआय लाइफ - ग्रुप मायक्रो शील्ड हा प्लॅन ज्यांना परवडणाऱ्या किंमतीमध्ये 'इन्शुरन्स कव्हर' हवे असते अशा लोकांसाठी खास करून घडवलेला आहे. एसबीआय लाइफ - ग्रुप मायक्रो शील्डने तुम्ही तुमच्या सदस्यांच्या बाबतीत काही दुर्दैवी घटना घडल्यास त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक संरक्षण मिळू शकेल असा निर्वाळा त्यांना देऊ शकता.


प्रॉडक्टची मुख्य वैशिष्ट्ये

  • तुमच्या सदस्यांच्या विम्याच्या गरजांसाठी एसबीआय लाइफ - ग्रुप मायक्रो शील्ड हा प्लॅन हा अचूक उत्तर आहे.
  • हा प्लॅन एम्लॉयर-एम्प्लॉयी ग्रुप्स, मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूट, सेल्फ हेल्प ग्रुप्स, बँक/फायनान्शियल ग्रुप्स, एनजीओज्, कोणतेही ऑफिशियल ग्रुप्स ( डिजिटल प्लॅटफॉर्म्स सह) वगैरेंचे सदस्य ह्यांना प्रचलित नियमनांच्या अनुसार व्यापकपणे कव्हर देतो.
  • एनरोल करणे आणि ॲडमिनिस्टर करणे सोपे.
  • प्रीमियम भरण्याची वारंवारिता लवचीक.

ठळक वैशिष्ट्ये

एसबीआई लाइफ – ग्रामीण सुपर सुरक्षा

एक ग्रुप, नॉन-लिंक्ड, नॉन-पार्टिसिपेटिंग, प्युअर रिस्क प्रीमियम, मायक्रो लाइफ इन्शुरन्स उत्पादन प्रॉडक्ट

वैशिष्ट्ये:

  • तुमच्या ग्रुपच्या सदस्यांसाठी टर्म इन्शुरन्स.
  • हे प्रॉडक्ट देते OYRGTA (वन इयर रीन्युवेबल ग्रुप टर्म ॲशुरन्स)
  • प्रीमियम भरण्याची वारंवारिता वार्षिक, सहामाही, तिमाही, मासिक आहे.
  • हे प्रॉडक्ट स्पाउज कव्हर बेनिफिट (ऑप्शनल) देते, जे ग्रुपच्या सदस्याच्या वैवाहिक जोडीदाराला डेथ कव्हर बेनिफिट पुरवणे ग्रुपच्या पॉलिसीधारकाला शक्य होण्यासाठी सक्तीचे किंवा ऐच्छिक असू शकते.

फायदे:

  • सुरक्षा: आकस्मिक काही घडल्यास तुमच्या सदस्यांच्या कुटुंबाच्या आर्थिक गरजा सुरक्षित रहातात.
  • लवचीकता: तुमच्या सदस्यांना तुम्ही देऊ इच्छिता ती सम ॲश्युअर्ड निवडण्याचा पर्याय.
  • सोपेपणा:वैद्यकीय तपासणीची गरज नाही, तुमच्या समाधानकारक आरोग्य जाहीरनाम्यावर स्वीकृती आधारित.
  • परवडणारा: प्लॅनचे लाभ नाममात्र प्रीमियम मध्ये.

मृत्यू लाभ :

कव्हरच्या मुदतीमध्ये कव्हर केलेल्या सदस्याचे दुर्दैवाने निधन झाल्यास डेथ बेनिफिट, जो बेसिक सम ॲश्युअर्ड एवढा असेल, तो एक रकमी दिला जाईल, ज्यासाठी सर्व देय प्रीमियम्स भरलेले असणे आवश्यक आहे. धनको-ऋणको योजनांच्या बाबतीत पात्र एंटिटीज* अंतर्गत सदस्याचे निधन झाल्यास लोनची उर्वरित रक्कम स्थापनेच्या वेळी ग्रुपच्या सदस्याकडून पूर्व प्राधिकाराच्या सापेक्ष एकूण डेथ बेनिफिट मधून मास्टर पॉलिसीधारकाला देय राहील आणि काही शिल्लक राहिल्यास ती नामनिर्देशित व्यक्तीला/लाभार्थीला देय राहील. प्राधिकार जर नसेल तर, डेथ बेनिफिटची रक्कम नामनिर्देशित व्यक्तीला किंवा लाभार्थीला देय राहील.

क्रेडिट लिंक्ड/धनको-ऋणको संबंधासाठी बेसिक सम ॲश्युअर्ड ही ग्रुपच्या एका सदस्यासाठी पॉलिसीच्या स्थापनेच्या वेळी असलेल्या लोनच्या उर्वरित रक्कमेएवढी किमान असेल आणि पॉलिसीच्या संपूर्ण मुदतभर ती तेवढीच राहील.

*पात्र संस्थांमध्ये खालील संस्थांचा समावेश आहे : (i) भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) नियंत्रित अनुसूचित व्यावसायिक बँका (सहकारी बँकांसह), (ii) भारतीय रिझर्व्ह बँकेचे नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्या (एनबीएफसीज), (iii) नॅशनल हाऊसिंग बोर्ड (एनएचबी) द्वारा नियंत्रित गृहकर्ज कंपन्या, (iv) नॅशनल अल्पसंख्यांक विकास वित्तीय संस्था (एनएमडीएफसी) आणि त्यांच्या राज्यांमधील चॅनेलाइजिंग एजन्सीज, (v) भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारा नियंत्रित लघु वित्तीय बँका, (vi) सदर संस्थांच्या संदर्भातील राज्यातील कायद्याच्या अंतर्गत स्थापना आणि नोंदणी करण्यात आलेल्या सहकारी परस्पर सहाय्य लाभलेल्या सहकारी संस्था, (vii) कंपनी कायदा, 2013च्या कलम 8 अंतर्गत किंवा कोणत्याही प्राधिकरणाने वेळोवेळी मंजूर केलेल्या इतर श्रेणीची नोंदणी करण्यात आलेल्या मायक्रोफायनान्स कंपन्या.

मॅच्युरिटी बेनिफिट:

ह्या प्लॅनमध्ये मुदतपूर्तीनंतर कोणताही बेनिफिट देय नाही.

सरेंडर बेनिफिट:

लागू नाही

ऑप्शन्स कव्हर-स्पाउज कव्हर बेनिफिट:

  • किमान 50 सदस्यांचा ग्रुप साइझ असलेल्या स्कीम हा ऑप्शन निवडू शकतात
  • हा ऑप्शन ग्रुप पॉलिसीधारकाला सदस्याच्या वैवाहिक जोडीदाराला डेथ बेनिफिट कव्हर पुरवू शकतो. हे कव्हर सक्तीचे किंवा ऐच्छिक असू शकते. सहभागाची आवश्यक किमान पातळी पॉलिसीच्या स्थापनेच्या वेळी असलेल्या ग्रुपच्या 10% आहे.
  • हा ऑप्शन मास्टर पॉलिसीधारक लेव्हलमध्ये उपलब्ध असू शकेल.
  • कव्हरेज प्राथमिक सदस्याच्या सम ॲश्युअर्ड पेक्षा कमी किंवा तेवढेच असू शकते.
  • प्राथमिक सदस्याच्या निधनानंतर वैवाहिक जोडीदारासाठीचे कव्हर हे प्रीमियम ज्या कालावधीसाठी कलेक्ट करण्यात आला आहे त्या पॉलिसी कालावधीच्या अखेरपर्यंत सुरूच राहील.

रीव्हायवल सुविधा:

  • वार्षिक प्रीमियम भरणा वारंवारितेसाठी लागू नाही.
  • वार्षिक व्यतिरिक्त इतर वारंवारितेसाठी:
    पहिल्या न भरलेल्या प्रीमियमच्या देय तारखेपासून 3 महिन्यांच्या आत आणि पॉलिसीची मुदत संपण्यापूर्वी पॉलिसी पुनरूज्जीवित करता येईल. विमित सदस्याकडून लेखी अर्ज व त्यासोबत विमित व्यक्तीच्या निरंतर विमायोग्यतेचा पुरावा प्राप्त झाल्यानंतर आणि सर्व देय प्रीमियम्स व्याजासह भरल्यानंतर पुनरूज्जीवनाचा विचार केला जाईल. कंपनीच्या मंडळाने मंजूर केलेल्या पॉलिसीच्या कराराच्या अधीन राहून पुनरूज्जीवनाची कार्यवाही करण्यात येईल. कंपनीद्वारे विमित सदस्याला त्यांचा निर्णय कळविण्यात आल्यानंतरच पुनरूज्जीवन अंमलात येईल.
    ग्रेस पीरियडच्या अखेरीनंतर (आणि रीव्हायवल पीरियड दरम्यान) सदस्याचे लाइफ कव्हर समाप्त होईल आणि सदस्याच्या निधनानंतर कोणताही डेथ बेनिफिट देय रहाणार नाही.
    कंपनीने वेळोवेळी घोषित केलेल्या दराने व्याज आकारले जाईल. कंपनीचे सध्याचे धोरण वार्षिक नाममात्र व्याजदरावर आधारित आहे आणि प्रत्येक आर्थिक वर्षाच्या 1 एप्रिल रोजी असलेल्या आरबीआय रेपो रेटच्या बेंचमार्क यिल्डपेक्षा 250 बेसिस पॉइंट्स जास्त असेल आणि दर सहा महिन्यांनी त्यात चक्रवाढ दराने वाढ होईल. 1 एप्रिल 2022 रोजीचा रेपो रेट 4.00% आहे. पुनरुज्जीवनासाठी व्याजदर ठरविण्याच्या पद्धतीत कोणताही बदल करताना लाइफ इन्शुरन्स उत्पादनांच्या रायडर्सचा उपयोग आणि फाईल, परिपत्रक क्र. IRDAI/ACTL/CIR/PRO/207/10/2022 दिनांकित 04 ऑक्टोबर 2022.

एसबीआय लाइफ - ग्रुप मायक्रो शील्डच्या जोखीम घटक, अटी आणि शर्तींवरील अधिक तपशीलांसाठी, खालील दस्तऐवज काळजीपूर्वक वाचा.

null
*शेवटच्या वाढदिवसाला असलेले वय.
**एसबीआय लाइफ ग्रुप इन्शुरन्सच्या सर्व प्रॉडक्ट्ससाठी एकूण सम ॲश्युअर्ड ही प्रति ग्रुप सदस्य रु. 2,00,000 पर्यंत कॅप केली जाईल
^लागू टॅक्सेस आणि /किंवा अन्य वैधानिक लेव्ही/ड्युटी/प्रीमियमवरील सरचार्ज, राज्य सरकार आणि केंद्र सरकार वेळोवेळी अधिसूचित करतील त्या दराने लागू कर कायद्याच्या अनुसार देय आहेत
$पॉलिसीची मुदत ही मास्टर पॉलिसी लेव्हल आहे.

3B/ver1/02/23/WEB/MAR


*कर लाभ:
तुम्ही/सदस्य भारतातील कर कायद्याच्या अनुसार प्राप्तिकरातील लाभ/सवलतींसाठी पात्र आहात, जे कायदे वेळोवेळी बदलू शकतात. तपशीलांसाठी कृपया तुमच्या टॅक्स ॲडवायझरचा सल्ला घ्या.
विक्री व्यवहार पूर्ण करण्यापूर्वी जोखमीचे घटक, अटी आणि शर्तीं ह्यांच्या अधिक तपशीलांसाठी कृपया विक्री माहितीपत्रक काळजीपूर्वक वाचा.