मायक्रो टर्म अ‍ॅश्युरन्स प्लॅन | एसबीआय लाइफ - ग्रुप मायक्रो शील्ड - एसपी
close

By pursuing your navigation on our website, you allow us to place cookies on your device. These cookies are set in order to secure your browsing, improve your user experience and enable us to compile statistics  For further information, please view our "privacy policy"

SBI Logo

Join Us

Tool Free 1800 22 9090

एसबीआय लाइफ - ग्रुप मायक्रो शील्ड - एसपी

UIN: 111N137V01

play icon play icon
एसबीआय लाइफ - ग्रुप मायक्रो शील्ड - एसपी

संरक्षणाच्या तुमच्या
वचनाची पूर्तता झाली

एक ग्रुप, नॉन-लिंक्ड, नॉन- पार्टिसिपेटिंग प्युअर रिस्क प्रीमियम, मायक्रो लाइफ इन्शुरन्स प्रॉडक्ट

तुमच्या ग्रुपच्या सदस्यांना किफायतशीर प्रीमियममध्ये लाइफ इन्शुरन्सचे संरक्षण देण्याची तुमची मनोमन इच्छा आहे का ?

तसे असेल तर, एसबीआय लाइफ - ग्रुप मायक्रो शील्ड - एसपी हा प्लॅन ज्यांना परवडणाऱ्या किंमतीमध्ये इन्शुरन्स कव्हर हवे असते अशा लोकांसाठी खास करून घडवलेला आहे. एसबीआय लाइफ - ग्रुप मायक्रो शील्ड - एसपी ने तुम्ही तुमच्या सदस्यांच्या बाबतीत काही दुर्दैवी घटना घडल्यास त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक संरक्षण मिळू शकेल असा निर्वाळा त्यांना देऊ शकता.

प्रॉडक्टची ठळक वैशिष्ट्ये:
  • तुमच्या सदस्यांच्या विम्याच्या गरजांसाठी एसबीआय लाइफ - ग्रुप मायक्रो शील्ड - एसपी हा प्लॅन हा परिपूर्ण उत्तर आहे.
  • एनरोल करणे आणि ॲडमिनिस्टर करणे सोपे.
  • लेव्हल कव्हर आणि रिड्युसिंग प्लॅन ऑप्शन्स दोन्हींमध्ये जॉइंट लाइफ कव्हरेज उपलब्ध आहे.
  • हा प्लॅन एम्लॉयर-एम्प्लॉयी ग्रुप्स, मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूट, सेल्फ हेल्प ग्रुप्स, बँक/फायनान्शियल ग्रुप्स, एनजीओज्, कोणतेही ऑफिशियल ग्रुप्स ( डिजिटल प्लॅटफॉर्म्स सह) वगैरेंचे सदस्य ह्यांना प्रचलित नियमनांच्या अनुसार व्यापकपणे कव्हर देतो.

ठळक वैशिष्ट्ये

ग्रुप मायक्रो शील्ड - एसपी

एक ग्रुप, नॉन-लिंक्ड, नॉन-पार्टिसिपेटिंग, प्युअर रिस्क प्रीमियम, मायक्रो लाइफ इन्शुरन्स उत्पादन प्रॉडक्ट

 

वैशिष्ट्ये:

  • तुमच्या ग्रुपच्या सदस्यांसाठी टर्म इन्शुरन्स.
  • हे प्रॉडक्ट 2 प्लॅन ऑप्शन्स देते - लेव्हल कव्हर रिड्युसिंग कव्हर (ऑप्शन फक्त धनको - ऋणको संबंधासाठीच उपलब्ध आणि ग्रुपच्या सदस्याद्वारे घेतलेल्या लोनच्या समक्ष घेता येऊ शकेल).
  • हे प्रॉडक्ट 10 वर्षांपर्यंतच्या पॉलिसी मुदतींसह सिंगल प्रिमियम भरण्याची मुदत देते.
  • लेव्हल कव्हर आणि रिड्युसिंग कव्हर प्लॅन ऑप्शन्स दोन्हींसाठी जॉइंट लाइफ कव्हरेज उपलब्ध आहे.
  • जॉइंट लाइफ कव्हरेज मध्ये, दोन व्यक्ती जर वैवाहिक जोडीदार, बहिणभाऊ किंवा पालक, मूल अशा जवळच्या रक्ताच्या नात्यातील वगैरे किंवा बिझनेस पार्टनर्स असतील तर ते कव्हर केले जातील. जीवनांना बदली पर्याय मिळण्याला अनुमती दिली जाणार नाही.

 

फायदे:

  • सुरक्षा: आकस्मिक काही घडल्यास तुमच्या सदस्यांच्या कुटुंबाच्या आर्थिक गरजा सुरक्षित रहातात.
  • लवचिकता: तुमच्या सदस्यांना तुम्ही देऊ इच्छिता ती सम ॲश्युअर्ड निवडण्याचा पर्याय.
  • सोपेपणा: वैद्यकीय तपासणीची गरज नाही, तुमच्या समाधानकारक आरोग्य जाहीरनाम्यावर स्वीकृती आधारित.  
  • परवडणारा: प्लॅनचा लाभ नाममात्र प्रीमियम मध्ये.

डेथ बेनिफिट:


कव्हरच्या मुदतीमध्ये कव्हर केलेल्या सदस्याचे किंवा जॉइंट लाइफ पॉलिसीच्या बाबतीत कव्हर केलेल्या कुणाही एका सदस्याचे दुर्दैवाने निधन झाल्यास डेथ बेनिफिट एक रकमी दिला जाईल. जॉइंट लाइफ पॉलिसीच्या बाबतीत दोन सदस्यांचे निधन एकाच वेळी झाल्यास फक्त एकच सम ॲश्युअर्ड देय असेल.
क्रेडिट लिंक्ड/ धनको-ऋणको संबंधासाठी बेसिक सम ॲश्युअर्ड ही ग्रुपच्या एका सदस्यासाठी पॉलिसीच्या स्थापनेच्या वेळी असलेल्या लोनच्या उर्वरित रक्कमेएवढी किमान असेल.
लेव्हल कव्हर: निधन प्रसंगीची बेसिक सम ॲश्युअर्ड दिली जाईल आणि कव्हर समाप्त होईल.
रिड्युसिंग कव्हर: निधन प्रसंगीची सम ॲश्युअर्ड जी कव्हरच्या स्थापनेच्या वेळी पुरवण्यात आलेल्या सर्टिफिकेट ऑफ इन्शुरन्स मधील लोन कव्हर शेड्युलच्या अनुसार असते, ती कव्हर करण्यात आलेल्या सदस्याच्या निधनाच्या तारखेला, लोनची प्रत्यक्ष उर्वरित रक्कम कितीही असली तरी लोन कव्हर शेड्युलच्या अनुसार दिली जाईल आणि कव्हर समाप्त होईल.
जॉइंट लाइफच्या बाबतीत, डेथ बेनिफीटची रक्कम दिल्यानंतर (पहिल्या निधनानंतर) हयात सदस्यांसाठी कव्हर खंडित होईल. धनको - ऋणको योजनांच्या बाबतीत पात्र एंटिटीज* अंतर्गत सदस्याचे /कर्मचाऱ्याचे निधन झाल्यास लोनची उर्वरित रक्कम. स्थापनेच्या वेळी ग्रुपच्या सदस्याकडून पूर्व प्राधिकाराच्या सापेक्ष एकूण डेथ बेनिफिट मधून मास्टर पॉलिसीधारकाला देय राहील आणि काही शिल्लक राहिल्यास ती नामनिर्देशित व्यक्तीला / लाभार्थीला देय राहील. प्राधिकार जर नसेल तर, डेथ बेनिफिटची रक्कम नामनिर्देशित व्यक्तीला/लाभार्थीला देय राहील. जिथे लाइफ इन्शुरन्स काढलेली व्यक्ती अल्पवयीन असेल तिथे पॉलिसी आपोआप लाइफ इन्शुरन्स काढलेली व्यक्ती सज्ञान झाल्यावर त्याच्या /तिच्या नावे नाहीत केली जाईल.
*पात्र संस्थांमध्ये खालील संस्थांचा समावेश आहे : (i) भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) नियंत्रित अनुसूचित व्यावसायिक बँका (सहकारी बँकांसह), (ii) भारतीय रिझर्व्ह बँकेचे नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्या (एनबीएफसीज), (iii) नॅशनल हाऊसिंग बोर्ड (एनएचबी) द्वारा नियंत्रित गृहकर्ज कंपन्या, (iv) नॅशनल अल्पसंख्यांक विकास वित्तीय संस्था (एनएमडीएफसी) आणि त्यांच्या राज्यांमधील चॅनेलाइजिंग एजन्सीज, (v) भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारा नियंत्रित लघु वित्तीय बँका, (vi) सदर संस्थांच्या संदर्भातील राज्यातील कायद्याच्या अंतर्गत स्थापना आणि नोंदणी करण्यात आलेल्या सहकारी परस्पर सहाय्य लाभलेल्या सहकारी संस्था, (vii) कंपनी कायदा, 2013च्या कलम 8 अंतर्गत किंवा कोणत्याही प्राधिकरणाने वेळोवेळी मंजूर केलेल्या इतर श्रेणीची नोंदणी करण्यात आलेल्या मायक्रोफायनान्स कंपन्या.

फ्री लुक कालावधी:


1.मास्टर पॉलिसीधारक प्रीमियम भरत असल्यास:
पॉलिसीच्या अटी आणि शर्ती यांचा आढावा घेण्यासाठी इलेक्ट्रॉनिक पॉलिसी किंवा दूरस्थ विपणनाद्वारे घेतलेल्या पॉलिसींव्यतिरिक्त इतर पॉलिसीसाठी पॉलिसी दस्तऐवज प्राप्त झाल्याच्या तारखेपासून 15 दिवसांचा फ्री लुक कालावधी, आणि इलेक्ट्रॉनिक पॉलिसी किंवा दूरस्थ विपणनाद्वारे घेतलेल्या पॉलिसीज्साठी, पॉलिसी दस्तऐवज मिळाल्याच्या तारखेपासून 30 दिवसांचा फ्री लुक कालावधी उपलब्ध असेल. मास्टर पॉलिसीधारकाला त्यापैकी कोणत्याही अटी किंवा शर्ती मान्य नसल्यास, मास्टर पॉलिसीधारकाला त्याच्या हरकतीची कारणे नमूद करून, पॉलिसी रद्द करण्यासाठी विमा कंपनीकडे परत करण्याचा पर्याय आहे आणि त्यानंतर कंपनी संरक्षणाच्या कालावधीसाठी त्या प्रमाणात जोखीम प्रीमियम आणि विमा कंपनीने प्रस्तावकर्त्याच्या वैद्यकीय तपासणीसाठी आणि मुद्रांक शुल्क शुल्कासाठी केलेला खर्च वजा करण्याच्या अधीन राहून फक्त भरलेली प्रीमियमची रक्कम परत करेल.
2 .विमाधारक सदस्य प्रीमियम भरत असल्यास:
पॉलिसीच्या अटी आणि शर्ती यांचा आढावा घेण्यासाठी इलेक्ट्रॉनिक पॉलिसी किंवा दूरस्थ विपणनाद्वारे घेतलेल्या पॉलिसींव्यतिरिक्त इतर पॉलिसीसाठी विम्याचे प्रमाणपत्र मिळाल्याच्या तारखेपासून 15 दिवसांचा फ्री लुक कालावधी, आणि इलेक्ट्रॉनिक पॉलिसी किंवा दूरस्थ विपणनाद्वारे घेतलेल्या पॉलिसीज्साठी, विम्याचे प्रमाणपत्र मिळाल्याच्या तारखेपासून 30 दिवसांचा फ्री लुक कालावधी उपलब्ध असेल. विमाधारक सदस्याला त्यापैकी कोणत्याही अटी किंवा शर्ती मान्य नसल्यास, विमाधारक सदस्यास विमा कंपनीस त्याच्या हरकतीची कारणे नमूद करून, विमा प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी परत करण्याचा पर्याय आहे आणि त्यानंतर कंपनी संरक्षणाच्या कालावधीसाठी त्या प्रमाणात जोखीम प्रीमियम आणि विमा कंपनीने प्रस्तावकर्त्याच्या वैद्यकीय तपासणीसाठी आणि मुद्रांक शुल्क शुल्कासाठी केलेला खर्च वजा करण्याच्या अधीन राहून फक्त भरलेली प्रीमियमची रक्कम परत करेल. संयुक्त जीवन संरक्षणाच्या बाबतीत दोन्ही सदस्यांचे जीवन संरक्षण एकाच वेळी संपुष्टात येईल आणि फ्री लुक रद्द करणे एकाच वेळी लागू केले जाईल.

मॅच्युरिटी बेनिफिट:


ह्या प्लॅनमध्ये मुदतपूर्ततेच्या वेळी कोणताही बेनिफिट देय नाही.

सरेंडर बेनिफिट:


सदस्याच्या पॉलिसीला सरेंडर व्हॅल्यू मिळेल आणि ती पॉलिसीच्या मुदतीमध्ये कधीही सरेंडर करता येईल. सरेंडर व्हॅल्यू ही अनएक्सपायर्ड रिस्क प्रीमियम एवढी असेल आणि ती पुढीलप्रमाणे आहे:
  • लेव्हल कव्हर : (70% x भरलेला सिंगल प्रीमियम ) x [अनएक्सपायर्ड मुदत (महिन्यांमध्ये)/एकूण मुदत (महिन्यांमध्ये)]
  • रिड्युसिंग कव्हर : (70% x भरलेला सिंगल प्रीमियम) x [अनएक्सपायर्ड मुदत (महिन्यांमध्ये)/एकूण मुदत (महिन्यांमध्ये)] x [शेड्युलच्या अनुसार सम ॲश्युअर्ड/ सुरुवातीची सम ॲश्युअर्ड]
अनएक्सपायर्ड मुदत = पॉलिसीची एकूण मुदत महिन्यांमध्ये वजा सरेंडरच्या तारखेला असलेले पॉलिसी महिने. सरेंडर केल्यावर, सर्व बेनिफिट्स आणि सदस्यांचे कव्हर खंडित केले जातील. सरेंडर व्हॅल्यू एक रक्कमी बेनिफिट म्हणून दिली जाईल.
मास्टर पॉलिसीधारकाने पॉलिसी सरेंडर केल्यास, सदस्यांना त्यांचे कव्हर त्यांच्या संबंधित कव्हरच्या मुदतीच्या अखेरपर्यंत सुरु ठेवण्याचा पर्याय मिळेल . ज्या सदस्यांना पॉलिसी कव्हर सुरु ठेवायचे नसेल, त्यांना सरेंडर व्हॅल्यू देय असेल आणि पॉलिसी कव्हर खंडित होईल.

जॉइंट लाइफ कव्हरेज :

  • जॉइंट लाइफ कव्हर फक्त धनको -ऋणको ग्रुप्स मध्येच उपलब्ध आहे.
  • हे लेव्हल कव्हर आणि रिड्युसिंग कव्हर ह्या दोन्ही ऑप्शन्ससाठी उपलब्ध आहे.
  • दोन व्यक्ती जर वैवाहिक जोडीदार, बहिणभाऊ किंवा पालक, मूल अशा जवळच्या रक्ताच्या नात्यातील वगैरे किंवा बिझनेस पार्टनर्स असतील तर ते कव्हर केले जातील. जीवनांना बदली पर्याय मिळण्याला अनुमती दिली जाणार नाही.
  • प्रत्येक ऋणको लोनच्या संपूर्ण उर्वरित रक्कमेसाठी - तीच सम ॲश्युअर्ड आणि त्याच पॉलिसी मुदतीसाठी - इन्शुअर केला जाईल. ऋणकोंपैकी कुणाही एकाचे निधन झाल्यास , डेथ बेनिफिट देय राहील आणि हयात ऋणकोंसाठी असलेले कव्हर संपुष्टात येईल.

ग्रेस पीरियड:


लागू नाही
विमाधारक सदस्याने मास्टर पॉलिसीधारकाला देय प्रीमियम भरली आहे आणि विमाधारक सदस्याला प्रीमियमची पोचपावती किंवा पावती जारी केली जात आहे, परंतु मास्टर पॉलिसीधारकाने सवलत कालावधीत विमा कंपनीला प्रीमियम भरलेली नाही अशी परिस्थिती आहे. त्यानंतर दावा करण्यात आल्यास, सदर दावा अन्यथा दाखल करण्यायोग्य आणि देय असल्यास, त्याचा सन्मान केला जाईल.
परंतू, ते विमाधारकाने मास्टर पॉलिसीधारकाकडे सदर देय प्रीमियम्स भरल्या असल्याचे सिद्ध करणारी संबंधित कागदपत्रे मास्टर पॉलिसीधारकाने सादर करण्याच्या अधीन असेल. इन्शुररकडे देय प्रीमियम भरल्यानंतरच दाव्याची रक्कम देण्यात येईल.

आत्महत्येच्या दाव्याची तरतूद:


सदस्याची जोखीम सुरू झाल्याच्या तारखेपासून 12 महिन्यांच्या आत, विमाधारक सदस्याने आत्महत्या करण्यामुळे मृत्यू झाल्यास, सदस्य पॉलिसी सुरू असल्यास, पॉलिसीधारकाच्या नामनिर्देशित व्यक्तीला किंवा लाभार्थीला मृत्यूच्या तारखेपर्यंत भरलेल्या एकूण प्रीमियमच्या 80% किंवा मृत्यूच्या तारखेला असलेले सरेंडर मूल्य, काही असल्यास, ह्यापैकी जे अधिक असेल तितकी रक्कम देय असेल. लागू केल्याप्रमाणे लाभाचे पैसे दिल्यानंतर, सदस्य पॉलिसी बंद होईल. एकूण भरलेल्या प्रीमियम्स ही कोणत्याही अतिरिक्त प्रीमियम आणि कर वगळता, त्या सदस्यासाठी भरलेल्या सर्व प्रीमियम्सची एकूण रक्कम असेल.

रीव्हायवल सुविधा:

लागू नाही

एसबीआय लाइफ - ग्रुप मायक्रो शील्ड - एसपीच्या अटी आणि शर्तींच्या जोखीम घटकावरील अधिक तपशीलांसाठी, खालील दस्तऐवज काळजीपूर्वक वाचा.

SBI Life- Group Micro Shield - SP Plan Premium
*शेवटच्या वाढदिवसाला असलेले वय.
**एसबीआय लाइफ ग्रुप इन्शुरन्सच्या सर्व प्रॉडक्ट्ससाठी एकूण सम ॲश्युअर्ड ही प्रति ग्रुप सदस्य रु. 2,00,000 पर्यंत कॅप केली जाईल
^लागू टॅक्सेस आणि /किंवा अन्य वैधानिक लेव्ही/ड्युटी/प्रीमियमवरील सरचार्ज, राज्य सरकार आणि केंद्र सरकार वेळोवेळी अधिसूचित करतील त्या दराने लागू कर कायद्याच्या अनुसार देय आहेत .
$उल्लेखलेली पॉलिसी मुदत ही मेंबर लेव्हलला लागू आहे. सिंगल प्रीमियम पॉलिसीमध्ये दिली जाणारी पॉलिसीची मुदत 1 ते 120 महिने आहे (दोन्ही धरून) आणि ग्रुप सदस्य लेव्हलसाठी 1 महिन्याच्या पटीमध्ये आहे ( म्हणजेच 1 महिना , 2 महिने...119 महिने आणि 120 महिने ). मास्टर पॉलिसी सर्व सदस्यांच्या कालमर्यादेच्या समाप्तीपर्यंत सुरु राहील क्रेडिट लिंक्ड/ ऋणको-धनको संबंधासाठी पॉलिसीची मुदत ही ग्रुपच्या एका सदस्यासाठी पॉलिसीच्या स्थापनेच्या वेळी असलेल्या लोनच्या उर्वरित मुदतीएवढी किमान असेल.

3A/ver1/02/23/WEB/MAR

*कर लाभ:
तुम्ही/सदस्य भारतातील कर कायद्याच्या अनुसार प्राप्तिकरातील लाभ/सवलतींसाठी पात्र आहात, जे कायदे वेळोवेळी बदलू शकतात. तपशीलांसाठी कृपया तुमच्या टॅक्स ॲडवायझरचा सल्ला घ्या.

विक्री व्यवहार पूर्ण करण्यापूर्वी जोखमीचे घटक, अटी आणि शर्तीं ह्यांच्या अधिक तपशीलांसाठी कृपया विक्री माहितीपत्रक काळजीपूर्वक वाचा.