How to Save on Health Insurance Premiums - Banner Image
५ मिनिटे वाचन
आरोग्य विमा

आरोग्य विम्याच्या प्रीमियम्सवर बचत कशी करावी? । एसबीआय लाईफ इन्श्युरन्स

आरोग्य विम्याच्या प्रीमियम्सवर बचत कशी करावी? । एसबीआय लाईफ इन्श्युरन्स

आरोग्य विम्याच्या प्रीमियम्सवर बचत कशी करावी? । एसबीआय लाईफ इन्श्युरन्स

आरोग्याच्या समस्या अचानक उद्भवू शकतात. तुम्हाला कधीतरी एखाद्या विषाणूचा किंवा हंगामी फ्लूचा संसर्ग होण्याची शक्यता नेहमीच असते. याहूनही अधिक गंभीर गुंतागुंती उद्भवू शकतात, ज्यासाठी रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता भासू शकते. अशा वेळी, तुम्ही आर्थिकदृष्ट्या सज्ज असणे आवश्यक आहे. म्हणूनच, आरोग्य विमा आवश्यक आहे. तथापि, विमा स्वस्त नसतो. काही वेळा तुम्हाला विम्याचे हप्ते भरणे परवडत नाही. पण, याचा अर्थ असा नाही की तुम्ही विमा काढणे टाळावे. असे काही मार्ग आहेत, ज्याद्वारे तुम्ही हे सुनिश्चित करू शकता की आरोग्य विम्याच्या हप्त्यांमुळे तुमचे खिसे रिकामे होणार नाहीत. त्यामुळे, तुम्हाला आरोग्य विम्यावरील खर्चात बचत कशी करावी हा प्रश्न पडला असेल, तर येथे असे ५ मार्ग दिले आहेत, ज्यांच्या मदतीने तुमच्या बचतीला धक्का न लावता तुम्ही विम्याचे संरक्षण मिळवू शकता.

1. नियोक्त्याची आरोग्य विमा पॉलिसी निवडा

1. नियोक्त्याची आरोग्य विमा पॉलिसी निवडा

आरोग्य विमा हप्त्यांवर बचत करण्याचा हा कदाचित सर्वोत्तम मार्ग आहे. संस्था सहसा आपल्या कर्मचाऱ्यांना आरोग्य विमा देतात. मासिक पगारातून काही कपात होऊ शकते, परंतु तरीही, स्वतंत्र आरोग्य विमा योजनेसाठी लागणाऱ्या खर्चापेक्षा तो खूपच कमी असतो. तुमच्यावर अवलंबून असलेल्या व्यक्तींना त्याच विमा पॉलिसीमध्ये समाविष्ट करण्याचा पर्याय असेल, तर तुमच्या जोडीदाराला, मुलांना किंवा पालकांना समाविष्ट करायला विसरू नका. तसे नसल्यास, अशी व्यवस्था करता येईल का, हे तुमच्या कंपनीला विचारून पहा. पारंपरिक आरोग्य योजनांच्या तुलनेत हा खर्च लक्षणीयरीत्या कमी असू शकतो.

२. आरोग्य विमा योजना लवकर खरेदी करा

२. आरोग्य विमा योजना लवकर खरेदी करा

आरोग्य विमा योजना खरेदी करताना तुमचे वय आणि आरोग्य यांसारख्या विविध घटकांच्या आधारावर आरोग्य विम्याचे हप्ते ठरवले जातात. तुमचे वय जितके कमी असेल, तितकी तुमची आजारी पडण्याची शक्यता कमी असते आणि विमा कंपनीसाठी तुम्ही कमी जोखमीचे असता. त्यामुळे, तुम्हाला आधीपासून कोणतीही वैद्यकीय समस्या नसल्यास, तरुणांसाठी हप्ते सहसा कमी असतात. अशा प्रकारे, लवकर आरोग्य विमा खरेदी केल्याने तुम्ही कमी हप्त्यांसाठी पात्र ठरता आणि तुमच्या आरोग्य विम्यावर बचत करू शकता.

३. थांबा आणि तुलना करा

३. थांबा आणि तुलना करा

बाजारात विविध प्रकारच्या आरोग्य विमा योजना उपलब्ध आहेत. समोर आलेली पहिलीच योजना तुम्ही खरेदी करू नये. तुमच्या गरजांचे विश्लेषण करून मगच पॉलिसी खरेदी करणे खूप महत्त्वाचे आहे. आजकालच्या आरोग्य विमा योजनांमध्ये अनेक अतिरिक्त वैशिष्ट्ये असतात, ज्यांची प्रत्येकालाच गरज असते असे नाही. या सर्व वैशिष्ट्यांमुळे विम्याचा हप्ता खूपच वाढतो. त्यांना गाळून टाका आणि तुम्हाला आवश्यक असलेल्या वैशिष्ट्यांचीच निवड करा. त्यानंतर, समान वैशिष्ट्ये देणाऱ्या योजनांची तुलना करा आणि त्यापैकी सर्वात स्वस्त योजना निवडा. यामध्ये तुम्हाला मदत करू शकणारी विविध ऑनलाइन फोरम तसेच ऑनलाइन प्रीमियम कॅल्क्युलेटर्स उपलब्ध आहेत.

४. जर तुम्हाला अतिरिक्त वैशिष्ट्ये परवडत नसतील, तर मूलभूत विमा संरक्षणाची निवड करा.

४. तुम्हाला अतिरिक्त वैशिष्ट्ये परवडत नसतील, तर मूलभूत विमा संरक्षणाची निवड करा

वर नमूद केल्याप्रमाणे, तुम्हाला आरोग्य योजनेच्या सर्व वैशिष्ट्यांची आवश्यकता नाही. काही योजनांमध्ये अतिरिक्त अंगभूत वैशिष्ट्ये असतात, ज्यांची किंमत जास्त असते, पण त्या केवळ ग्राहकांना आकर्षित करण्यासाठीच बनवलेल्या असतात. तुम्हाला अशा योजना परवडत नसतील, तर मूलभूत रुग्णालयीन संरक्षणाची निवड करा. तुम्ही आजारी पडल्यास आणि तुम्हाला रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता भासल्यास, हे विमा संरक्षण तुम्हाला आर्थिक आधार देण्यात मोलाची मदत करू शकते.

५. निरोगी जीवनशैलीचा अवलंब करा

५. निरोगी जीवनशैलीचा अवलंब करा

शेवटी, हे सर्व तुम्ही किती तंदुरुस्त आहात यावर अवलंबून आहे. धूम्रपान किंवा मद्यपान सोडल्याने, किंवा वजन कमी केल्याने तुम्हाला निरोगी राहण्यास, रुग्णालयाच्या फेऱ्यांवर होणारा खर्च वाचवण्यात आणि आरोग्य विम्याचा हप्ता कमी करण्यातही मदत होऊ शकते. त्यामुळे, त्यामुळे, ही सर्वांसाठी फायदेशीर परिस्थिती आहे.

आजच्या जगात आरोग्य विमा हा एक पर्याय न राहता एक गरज बनला आहे, हे लक्षात ठेवा. हे केवळ तुम्हाला आर्थिक तणावापासून वाचवत नाही, तर तुम्ही आजारी पडल्यास, तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला वैद्यकीय उपचारांच्या प्रचंड खर्चाची चिंता न करताच, दर्जेदार आरोग्यसेवा मिळवून देण्यासही मदत करू शकते.

संबंधित लेख