तुमच्या मुलाच्या भविष्याचे नियोजन कसे करावे?
तुमच्या मुलाच्या भविष्याचे नियोजन कसे करावे?
मूल होणे ही एक मोठी जबाबदारी आहे. त्यासाठी तुम्ही भावनिकदृष्ट्या तयार असले पाहिजे. जेव्हा तुम्ही मुलांसाठी आर्थिक नियोजनाचा विचार करता, तेव्हा तुमच्या मनात प्रश्न येतो, की तुमच्या मुलाच्या शिक्षणाचे आणि लग्नाचे नियोजन कसे करावे. पण मुलांसाठी आर्थिक नियोजनात त्याहूनही बरेच काही समाविष्ट आहे. फक्त बचत खाते किंवा बाल योजना असणे पुरेसे नाही. तुमच्या मुलाच्या भविष्यासाठी योग्य नियोजन करण्यासाठी प्रत्येक टप्प्यावर तयार असणे ही गुरुकिल्ली आहे. आम्ही तुम्हाला काही सूचना देतो-
आपल्या मुलाला सुरक्षित ठेवा
जेव्हा तुम्ही तुमच्या मुलासाठी आर्थिक नियोजन सुरू करता, तेव्हा सर्वात आधी तुम्ही त्याच्या/तिच्यासाठी गुंतवणूक करण्याचा विचार केला पाहिजे. तुम्ही अनुपस्थित असतानाही तुम्ही त्याच्यासोबत असायला हवे. तुम्ही विमा पॉलिसीने सुरुवात करू शकता. तुमच्या मुलाचे शिक्षण किंवा लग्न यांसारखी नजीकच्या काळातील उद्दिष्ट्ये पूर्ण करण्यासाठी तुम्ही टर्म लाईफ इन्शुरन्सची निवड करू शकता, किंवा तुम्ही अशी जीवन विमा पॉलिसी घेऊ शकता जी तुमच्या अनुपस्थितीतही तुमच्या मुलाला आर्थिक सुरक्षिततेची हमी देईल. तुम्हाला आरोग्य विमा योजनेची निवड करणे देखील आवश्यक आहे. हा एक पर्याय न राहता, ती एक गरज बनली आहे. आरोग्याच्या समस्या कोणत्याही सूचनेशिवाय उद्भवू शकतात. त्यामुळे, कोणत्याही संभाव्य परिस्थितीसाठी आधीच तयार राहणे चांगले. तुमच्या मुलाचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी चाइल्ड प्लॅन देखील खूप उपयुक्त ठरू शकतो.
महागाईचा विचार करा
आर्थिक नियोजनाचा हा कदाचित सर्वात महत्त्वाचा पैलू आहे, ज्याकडे पालक दुर्लक्ष करतात. महागाईमुळे सर्वच गोष्टींच्या किमती वाढत आहेत. उउदाहरणार्थ, तुमचे मूल मोठे होईल तेव्हा विद्यापीठाचे शुल्क आजच्याइतकेच असेलच असे नाही. त्यामुळे, तुम्हाला तुमच्या मुलाच्या शिक्षणासाठी निधीचे नियोजन कसे करावे, असा प्रश्न पडला असेल, तर तुम्हाला या गोष्टीचाही विचार करावा लागेल. विमा पॉलिसी किंवा चाइल्ड प्लॅन निवडतानाही हेच नियम लागू पडते. वाढत्या किमती लक्षात घेऊन तुम्हाला विम्याची रक्कम निवडावी लागेल. म्हणूनच, सुमारे १०% वार्षिक महागाईचा विचार करण्याचा तज्ज्ञ सल्ला देतात.
तुमच्या सर्व खर्चांचा विचार करा
मुलांचे अनेक अल्पकालीन आणि दीर्घकालीन दोन्हीही खर्च असतात. दीर्घकालीन खर्चांमध्ये उच्च शिक्षण किंवा लग्न यांचा समावेश आहे. तुम्ही लवकर सुरुवात करत असल्यास, तुम्ही इक्विटी फंडमध्ये गुंतवणूक करून पुरेसे पैसे वाचवू शकता. मात्र, तुमच्यावर इतर जबाबदाऱ्या असल्यास, तुम्ही डेट आणि इक्विटीचा समावेश असलेला संतुलित गुंतवणूक पोर्टफोलिओ निवडू शकता. तुम्हाला जोखीममुक्त उत्पादन हवे असल्यास, तुम्ही पीपीएफ योजना देखील पाहू शकता. मात्र, तुम्हाला शाळा व कोचिंग फी आणि मनोरंजन न इतर खर्च यांसारख्या अल्पकालीन खर्चासाठी वेगळी व्यवस्था करावी लागेल. यांपैकी कोणताही खर्च पूर्ण करण्यासाठी तुमच्या दीर्घकालीन बचतीचा वापर करू नका.
तुमच्या ध्येयांकडे किंवा अल्पकालीन खर्चांकडे दुर्लक्ष करू नका.
आपल्या मुलासाठी नियोजन करताना स्वतःच्या ध्येयांकडे दुर्लक्ष करू नका. अनेक पालक आपल्या निवृत्तीचे नियोजन न करता आपली संपूर्ण बचत मुलांसाठी वापरतात. घर, गाडी खरेदी करणे, प्रवास करणे यांसारखे खर्चही असू शकतात, ज्यांचे तुम्हाला स्वतंत्रपणे नियोजन करणे आवश्यक आहे. तुमच्या मुलांच्या खर्चासाठी तुमची निवृत्तीची बचत वापरू नका. याच कारणास्तव, तुमच्याकडे मुलांसाठी एक स्वतंत्र योजना असायला हवी.
सरतेशेवटी, बचत करणे, खात्रीशीर फंडांमध्ये गुंतवणूक करणे, विवेकपूर्ण खर्च करणे आणि योग्य नियोजन करणे हेच महत्त्वाचे आहे. यामुळे तुम्हाला तुमच्या मुलांच्या भविष्याचे अधिक चांगल्या प्रकारे नियोजन करण्यास मदत तर होईलच, शिवाय तुमच्या मुलांसाठी एक चांगला आदर्शही निर्माण होईल.