एसबीआय लाईफ इन्शुरन्सचा हप्ता भरण्यासाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पर्यायांमधून निवड करण्यासाठी असंख्य पर्याय आहेत. तथापि, इंटरनेटद्वारे सर्व काही सहज उपलब्ध असल्याने, तुमच्या इन्शुरन्सचे हप्ते भरणे अधिक सोयीस्कर झाले आहे. तुम्ही काही क्लिक्समध्ये तुमचे हप्ते ऑनलाइन भरू शकता. आम्ही तुम्हाला विमा हप्ता ऑनलाइन कसा भरायचा ते सांगतो -
१. इंटरनेट बँकिंग - विम्याचा हप्ता ऑनलाइन भरण्याचा नेटबँकिंग हा एक उत्तम मार्ग आहे. तुमचे एसबीआय किंवा त्यांच्या कोणत्याही भागीदार बँकेत खाते असेल, तर तुम्ही खालील पायऱ्यांचे पालन करून इंटरनेट बँकिंगद्वारे तुमच्या विम्याचे हप्ते भरू शकता.
- एसबीआय लाईफला तुमचा बिलर म्हणून जोडा
- तुमचा पॉलिसी क्रमांक आणि वैयक्तिक माहिती द्या
- तपशिलांची पडताळणी केली जाईल आणि ही सेवा तुमच्या खात्यावर सक्रिय केली जाईल
- आता तुम्ही तुमचे हप्ते देय तारखेसह पाहू शकता. तुम्ही त्वरित पैसे भरणे निवडू शकता किंवा इंटरनेट बँकिंगद्वारे हप्त्याचे पेमेंट शेड्यूल करू शकता
२. एसबीआय लाईफ वेबसाइट - तुम्ही एसबीआय लाईफ वेबसाइटद्वारे सहजपणे ऑनलाइन विमा हप्ता भरू शकता
- वेबसाइटला भेट द्या आणि तुमचे हप्ते ऑनलाइन भरण्यासाठी पर्याय निवडा
- तुमचा पॉलिसी क्रमांक आणि वैयक्तिक तपशील प्रविष्ट करा
- एकदा तुम्ही तुमचे तपशील सबमिट केले आणि त्यांची पडताळणी झाली, की तुम्ही तुमच्यासाठी सर्वात सोयीस्कर पेमेंट पद्धत निवडू शकता आणि पैसे देऊ शकता
३. व्हिसा क्रेडिट कार्ड्स - तुमच्या विम्याचा हप्ता ऑनलाइन भरण्याचा हा कदाचित सर्वात जलद मार्ग आहे
- तुम्हाला visabillpay.com वर नोंदणी करावी लागेल
- एसबीआय लाईफला तुमचा बिलर म्हणून जोडा
- पॉलिसीची माहिती द्याा
- पडताळणीनंतर, तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डद्वारे तुमचे विमा हप्ते ऑनलाइन पाहू आणि भरू शकता.
तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डवर स्वयंचलित बिल पेमेंटसाठी स्थायी सूचनादेखील देऊ शकता.हे फक्त VISA आणि MasterCard साठीच काम करेल. याची प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे.
- तुमचा पेमेंट गेटवे म्हणून बिलडेस्क निवडा
- 'क्रेडिट कार्डद्वारे पैसे द्या' हा पर्याय निवडा
- 'एक वेळ पेमेंट + स्थायी सूचना' वर क्लिक करा
- स्थायी सूचना सक्रिय होण्यासाठी सुमारे ३-४ कामकाजाचे दिवस लागतील. हप्त्याच्या पुढील तारखेपासून तुमचे बिल थेट तुमच्या क्रेडिट कार्डवर पाठवले जाईल.
४. मोबाईल ॲप - मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे तुमचे एसबीआय लाईफ इन्शुरन्स हप्ते ऑनलाइन भरण्याचा एक सोपा पर्यायदेखील आहे.
- तुमच्या मोबाईलसाठी एसबीआय लाईफ इझी अॅक्सेस ॲप्लिकेशन डाउनलोड करा
- नोंदणी केल्यानंतर, ‘नूतनीकरण प्रीमियम पेमेंट’ या पर्यायावर क्लिक करा.
- तुमचा पॉलिसी क्रमांक आणि वैयक्तिक तपशील प्रविष्ट करा
- पेमेंटचा प्रकार निवडा आणि पेमेंट करा.
५. मोबाईल वॉलेट्स - तुम्ही एसबीआय बडी, जिओ मनी वॉलेट किंवा पेटीएम सारख्या काही लोकप्रिय वॉलेट्सचा वापर करून एसबीआय लाईफ इन्शुरन्स हप्ता ऑनलाइनदेखील भरू शकता. या सर्व अॅप्समध्ये विम्याचा हप्ता भरण्याची प्रक्रिया जवळजवळ सारखीच आहे.
- कोणतेही समर्थित मोबाइल वॉलेट डाउनलोड करा
- तुम्ही आधीच प्रोफाइल तयार केले नसेल, तर ते तयार करा
- विम्याचा हप्ता भरण्यासाठी पर्याय निवडा
- एसबीआय लाइफ इन्शुरन्स निवडा
- तुमचा पॉलिसी क्रमांक आणि वैयक्तिक तपशील प्रविष्ट करा
- पडताळणीनंतर, तुम्ही तुमच्या वॉलेटमध्ये असलेल्या कोणत्याही पेमेंट पद्धतीद्वारे तुमचा विम्याचा हप्ता ऑनलाइन भरू शकाल.
तुमचा विमा हप्ता ऑनलाइन भरण्यापूर्वी , तुम्ही अचूक माहिती भरली आहे याची नेहमी खात्री करा. तसेच, कोणताही गोंधळ टाळण्यासाठी, पैसे भरण्यापूर्वी तुमच्या हप्त्याच्या बिलातील सर्व शुल्कांची पडताळणी करा.