टर्म प्लॅनमध्ये गुंतवणूक करण्यासाठी २० हे वय ‘खूप लवकर’ का नाही?
टर्म प्लॅनमध्ये गुंतवणूक करण्यासाठी विशी हे वय 'खूप लवकर' का नाही
विशीतले तरुण एकतर कॉलेजमध्ये असतात किंवा नुकतीच आपल्या करिअरची सुरुवात करत असतात. तुम्ही तरुण आणि उत्साही असता. भविष्यासाठी बचत करणे, निवृत्तीचे नियोजन करणे आणि आर्थिक उद्दिष्ट्ये ठरवणे हे अजूनही अनेकांसाठी प्राधान्याचे नसते. पण तुम्ही एकतर विमा काढण्याचा विचार पुढे ढकलता किंवा त्याबद्दल अजिबात विचार करत नाही. पण लवकर सुरुवात करणे नेहमीच श्रेयस्कर असते. ऑनलाइन टर्म पॉलिसी निवडण्यासाठी किंवा विमा एजंटशी संपर्क साधण्यासाठी विशीच्या दशकापेक्षा चांगला काळ असूच शकत नाही. का ते जाणून घेण्यासाठी वाचा-
टर्म इन्शुरन्स प्लॅन्स कमी प्रीमियममध्ये जास्त कव्हरेज देतात. बहुतेक तरुणांवर कोणतीही मोठी आर्थिक उद्दिष्ट्ये किंवा जबाबदाऱ्या नसल्यामुळे, त्यांना टर्म प्लॅन्सचे प्रीमियम भरणे अवघड नसते. तसेच, ऑनलाइन टर्म पॉलिसीचे प्रीमियम ऑफलाइन इन्शुरन्स प्लॅनच्या तुलनेत कमी असतात.
टर्म प्लॅन मिळवणे अगदी सोपे आहे. विमा कंपन्या तुम्हाला इंटरनेटवरूनही टर्म इन्शुरन्स पॉलिसी खरेदी करण्याचा पर्याय देतात. आता तुम्ही भारतातील काही सर्वोत्तम टर्म प्लॅन्सची वैशिष्ट्ये आणि ऑफर्स सहजपणे पाहू शकता. ऑनलाइन उपलब्ध असलेले टर्म इन्शुरन्स कॅल्क्युलेटर आणि इतर साधने तुम्हाला माहितीपूर्ण निर्णय घेण्यास अधिक मदत करतात.
विमा कंपन्या सामान्यतः तरुण लोकांसाठी कमी प्रीमियम आकारतात. याचे कारण म्हणजे त्यांना वैद्यकीय आजारांचा धोका कमी असतो. तुलनेने, वाढत्या वयानुसार प्रीमियम वाढत जातो. त्यामुळे, जास्त वयात पॉलिसी घेण्यापेक्षा तरुण वयात टर्म कव्हर घेणे स्वस्त पडते.
जरी विशीतल्या व्यक्तीवर कोणी अवलंबून नसले तरी, तुमचे आई-वडील आणि भावंडे असू शकतात जे तुमच्यावर आर्थिक तसेच भावनिकदृष्ट्या अवलंबून आहेत. टर्म प्लॅन त्यांचे आर्थिक भविष्य सुरक्षित करतो, विशेषतः जर तुम्ही कुटुंबातील एकमेव कमावते सदस्य असाल. टर्म प्लॅनमधून मिळणारी रक्कम त्यांना दैनंदिन खर्च तसेच तुमची इतर कर्जे आणि दायित्वे व्यवस्थापित करण्यास मदत करते. त्यामुळे, तुमच्यानंतर तुमचे कुटुंब निश्चिंत राहील, हे समाधान टर्म प्लॅन तुम्हाला देतो.
टर्म इन्शुरन्सचा कर लाभ हे आणखी एक कारण आहे ज्यामुळे तरुणांनी टर्म प्लॅनमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करावा. पॉलिसीअंतर्गत भरलेले प्रीमियम आयकर कायदा १९६१ च्या कलम ८०सी अंतर्गत कपातीसाठी पात्र असतील. टर्म इन्शुरन्स प्लॅनची मिळणारी रक्कम भारतीय आयकर कायदा १९६१ च्या कलम १० (१०डी) अंतर्गत करमुक्त आहे.
कृपया लक्षात घ्या की आयकर कायदे वेळोवेळी बदलू शकतात. जीवन विमा पॉलिसीमध्ये उपलब्ध असलेल्या कर लाभांविषयी कृपया आपल्या वैयक्तिक कर सल्लागाराकडून सल्ला घ्या.
टर्म प्लॅन ही कोणत्याही वयात एक फायदेशीर गुंतवणूक आहे. टर्म इन्शुरन्स प्लॅनची बहुउपयोगिता आणि परवडणारी किंमत यामुळे तो मिलेनियल्ससाठी अधिकच योग्य ठरतो. म्हणूनच, तज्ज्ञ तरुण वयातच टर्म इन्शुरन्स प्लॅन खरेदी करण्याचा सल्ला देतात.
कर सवलती आयकर कायद्यांनुसार आहेत आणि त्या वेळोवेळी बदलू शकतात. अधिक तपशिलांसाठी कृपया आपल्या कर सल्लागाराचा सल्ला घ्या. अधिक माहितीसाठी आपण येथे आमच्या वेबसाइटला भेट देऊ शकता.