एसबीआय लाईफ – स्मार्ट फ्यूचर चॉइस: तुमचे जीवन भविष्यासाठी सुरक्षित करण्याचा सर्वोत्तम मार्ग
एसबीआय लाईफ – स्मार्ट फ्यूचर चॉइस: तुमचे जीवन भविष्यासाठी सुरक्षित करण्याचा सर्वोत्तम मार्ग
जीवन विमा कंपन्यांनी देऊ केलेले बचत आराखडे हे तुम्हाला तुमच्या भविष्याचे नियोजन करण्यास मदत करणारी प्रभावी साधने आहेत. ते तुमच्या जीवनातील उद्दिष्टांसाठी नियमित बचत करण्याच्या अतिरिक्त फायद्यासह विमा संरक्षण देतात. व्यक्तीला जीवनाच्या सर्व पैलूंमध्ये निवडीचे स्वातंत्र्य आहे आणि जीवन विमा त्यापैकी एक आहे. एसबीआय लाईफ इन्श्युरन्स कंपनी लिमिडेट ही कंपनी एसबीआय लाईफ - स्मार्ट फ्यूचर चॉइसेस ही योजना सादर करते; या योजनेचा उद्देश असा आहे की, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर तुमच्यासाठी सर्वोत्तम काय आहे, हे ठरवण्याचे सामर्थ्य तुमच्या भविष्यातील स्वतःला प्राप्त व्हावे.
या योजनेबद्दल अधिक माहिती खाली वाचा.
कंपनी एसबीआय लाईफ - स्मार्ट फ्यूचर चॉइसेस काय आहे?
एसबीआय लाईफ - स्मार्ट फ्युचर चॉइसेस हे एक वैयक्तिक, नॉन-लिंक्ड, सहभागी जीवन विमा बचत उत्पादन आहे, जे तुम्हाला जीवनाच्या विविध टप्प्यांवर तुमच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी एकरकमी किंवा लवचिक हप्त्यांमध्ये लाभ मिळवण्याची आणि नियमित कॅश बोनस मिळवण्याची संधी देते. यासोबतच, हे तुम्हाला पॉलिसीच्या कालावधीत वेळोवेळी बदलणाऱ्या गरजांनुसार तुमच्या पर्यायांचा आढावा घेण्याचे, तसेच आयकर कायद्यांमधील तरतुदींनुसार कर लाभांचा लाभ घेण्याचे अधिकार प्रदान करते.
ही योजना कोणासाठी आहे?
ही योजना १८ ते ५० वयोगटातील अशा व्यक्तींच्या आर्थिक गरजा लक्षात घेऊन तयार करण्यात आली आहे, ज्यांना जीवन विमा संरक्षण, मागणीनुसार रक्कम मिळण्याचा पर्याय आणि कर सवलती यांसारखे अतिरिक्त लाभ देणाऱ्या बचत उत्पादनाच्या शोधात आहेत.
एसबीआय लाईफ - स्मार्ट फ्युचर चॉइसेस योजना का निवडावी?
आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर तुमची दीर्घकालीन आणि अल्पकालीन उद्दिष्टे बदलतात. उदाहरणार्थ, एखादी तरुण, अविवाहित व्यक्ती कदाचित नवीन बाईक किंवा गाडी घेण्यासाठी बचत करेल, किंवा सहलीचे नियोजन करेल; आणि भविष्यासाठी बचत करणे ही गोष्ट कदाचित त्याच्या मनात सर्वात शेवटी असेल. विवाहित व्यक्ती नवीन घर खरेदी करण्यावर, जोडीदाराच्या गरजांचे नियोजन करण्यावर आणि अवलंबून असलेल्या व्यक्तींना आर्थिक आधार देण्यावर लक्ष केंद्रित करू शकते. ज्या व्यक्तींना मुले आहेत, त्या त्यांच्या उच्च शिक्षण, विवाह आणि जीवनशैलीशी संबंधित खर्चाची तयारी करण्याच्या विचारात असतील. रिटायर्मेंटनंतर, एखाद्या व्यक्तीला तुमचे छंद आणि नवीन मनोरंजक व्यवसायांमध्ये रमून राहायला आवडू शकते.
आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावरील आर्थिक आवश्यकता, तुमच्या जबाबदाऱ्या आणि जीवनशैलीच्या निवडींनुसार बदलते. त्यामुळे, तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यासाठी आवश्यक असलेली आर्थिक संसाधने बदलत जातात.
एसबीआय लाईफ - स्मार्ट फ्युचर चॉइसेस योजना तुम्हाला "निवडीचा अधिकार" वापरण्यास मदत करते. हे तुम्हाला तुमच्या आयुष्यातील प्रत्येक टप्प्याचे नियोजन करण्यास मदत करू शकते. मागणीनुसार पैसे प्राप्त करण्याच्या पर्यायासह पैसे काढण्याचे पर्याय निवडण्याची लवचिकता आणि पॉलिसीच्या मुदतीदरम्यान जीवन विमा संरक्षणाची हमी, तुम्हाला आयुष्यातील अनिश्चिततेसाठी तयार राहण्यास मदत करते.
एसबीआय लाईफ - स्मार्ट फ्युचर चॉइसेस तुम्हाला भविष्यातील प्रत्येक संधी आणि जबाबदारी आत्मविश्वासाने पेलण्यासाठी सज्ज करते. हे तुम्हाला कोणतीही तडजोड न करता आयुष्य जगण्याचे स्वातंत्र्य आणि पर्याय देते. तुमचे विमा संरक्षण आणि मिळणारी रक्कम निवडण्याचे स्वातंत्र्य, हीच गोष्ट याला सर्वोत्तम बचत योजनांपैकी एक बनवते. बचत योजनांपैकी एक बनवते.
एसबीआय लाईफ - स्मार्ट फ्युचर चॉइसेस योजनेबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी आणि तुमचे आर्थिक नियोजन भविष्यासाठी सुरक्षित करण्यासाठी, आमच्या प्रतिनिधींशी संपर्क साधा किंवा आमच्या हेल्पलाइन क्रमांकावर कॉल करा.