या आंतरराष्ट्रीय महिला दिनी, त्याचे आणि त्याच्या कुटुंबाचे रक्षण करा
या आंतरराष्ट्रीय महिला दिनी, त्याचे आणि त्याच्या कुटुंबाचे रक्षण करा
आंतरराष्ट्रीय महिला दिन हा अशा व्यक्तींचा गौरव करण्याचा दिवस आहे, ज्यांना समाजात समानतेसाठी आजही लढा द्यावा लागतो. एखाद्या स्त्रीसाठी, समानतेची लढाई ही कामाच्या ठिकाणी मिळणाऱ्या समान वेतन आणि बढत्यांपासून ते घरातील निर्णयांमध्ये आपला शब्द असण्यापर्यंत विस्तारलेली असते.
दुर्दैवाने, अनेक प्रकरणांमध्ये लोक स्त्रीच्या आयुष्याच्या मूल्याकडे क्वचितच लक्ष देतात. जर घरातील महिलेला काही झाले तर तिच्या प्रियजनांचे काय होईल?
या लेखामध्ये, आम्ही महिलांना त्यांच्या प्रियजनांच्या सुरक्षिततेसाठी समान भूमिका बजावण्याचे आवाहन करण्याचा प्रयत्न करतो. आमचा संदेश पोहोचवण्यासाठी, आम्ही २०२० च्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाची संकल्पना समान जग हेच सक्षम जग #EachForEqual स्वीकारू.
आपल्यासाठी सर्वस्व असलेल्या व्यक्तींचे रक्षण करतानाही, आपण #EachforEqual राहूया.
महिलांनी आपल्या कुटुंबाचे रक्षण करणे म्हणजे काय?
ज्याप्रमाणे एखाद्या पुरूषाच्या निधनामुळे त्याच्या प्रियजनांवर आर्थिक भार पडू शकतो, तसेच एका महिलेवरही लागू होते. महिला दिनाच्या उत्सवादरम्यान, एखाद्या महिलेच्या निधनाचा तिच्या कुटुंबावर काय आर्थिक परिणाम होऊ शकतो याचा विचार करा. अशा परिस्थितीत, जीवन विमा तिच्या प्रियजनांचे रक्षण करेल.
येथे काही सामान्य उदाहरणे आहेत जिथे जीवन विमा महिलेच्या कुटुंबाला सुरक्षित ठेवण्यास मदत करू शकतो.
जेव्हा ती गृहिणी असते
ती स्वतः कमवत नसल्यामुळे, फक्त पतीच्या निधनामुळेच आर्थिक बोजा पडेल असे गृहीत धरणे साहजिकच आहे. खरे म्हणजे तसे नाही.
एक स्त्री तिच्या घराची, तिच्या पतीची आणि तिच्या मुलांची काळजी घेण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. तिच्या निधनाचा तिच्या पतीवर केवळ भावनिक परिणाम होणार नाही तर त्याला त्याच्या पत्नीची जबाबदारीही घ्यावी लागेल. अशा भावनिक काळात घराची आणि मुलांची काळजी घेतल्याने त्याच्या कामाच्या क्षमतेवर परिणाम होईल. गोष्टी व्यवस्थित करण्यासाठी त्याला कामातून वेळ काढावा लागू शकतो. यामुळे आर्थिक समस्या निर्माण होऊ शकते.
एका महिलेच्या जीवन विम्याची रक्कम तिच्या पतीला काही काळ कुटुंबावर लक्ष केंद्रित करण्यास आणि कमाईची चिंता न करण्यास अनुमती देईल. ही रक्कम तिच्या मुलांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी भेट म्हणून देखील काम करू शकते.
एक स्त्री ही एकटीच आपल्या मुलांचा सांभाळ करणारी आई असू शकते, आपल्या प्रियजनांची जबाबदारी पेलणारी मुलगी असू शकते, किंवा पती आणि मुलांचा आधार बनणारी पत्नी असू शकते. दोन्ही बाबतीत, एका महिलेने तिच्या कुटुंबावर तिच्या मृत्यूचा परिणाम समजून घेतला पाहिजे. तिच्याकडे त्यांच्यासाठी पुरेशी बचत असेल का? तिच्या मुलांच्या शिक्षणाचे आणि भविष्याचे काय?
अशा परिस्थितीमध्ये, महिलेने मुलांचे शिक्षण किंवा आर्थिक सुरक्षा यांसारख्या विशिष्ट गरजांची पूर्तता करणाऱ्या जीवन विम्याची निवड करावी.
निष्कर्ष काढण्यासाठी…
या वर्षी, महिला दिनाचे सोहळे 'लिंग-समानता असलेला जग अधिक निरोगी, समृद्ध आणि सुसंवादी असू शकते,' या कल्पनेवर आधारित आहेत.
आमची अशी सूचना आहे की ज्याअर्थी लैंगिकदृष्ट्या समानतेसाठी एक चढाओढ सुरू आहे त्याअर्थी आपल्या प्रियजनांप्रती जबाबदारीच्या बाबतीतही लैंगिक समानता का नसावी?
या आंतरराष्ट्रीय महिला दिनी, आम्ही अशा एका लैंगिकदृष्ट्या समान जगाची संकल्पना मांडत आहोत जे अधिक निरोगी, समृद्ध, सुसंवादी आणि तितकेच सुरक्षित असेल.