Tips for Blood pressure
५ मिनिटे वाचन
जीवनसुलभ उपाय

कमी रक्तदाब असलेल्या लोकांसाठी ५ नैसर्गिक सूचना

कमी रक्तदाब असलेल्या लोकांसाठी ५ नैसर्गिक सूचना

कमी रक्तदाब असलेल्या लोकांसाठी ५ नैसर्गिक सूचना

उच्च रक्तदाब अधिक प्रमाणात आढळत असला, तरी लोकांना प्रभावित करणारा आणखी एक विकार म्हणजे हायपोटेन्शन, म्हणजेच ९०/६० मिमि एचजी पेक्षा कमी रक्तदाब असणे. हा एक गंभीर विकार आहे आणि तो प्रामुख्याने वृद्धापकाळामुळे होतो.यावर उपचार केले नाहीत, तर यामुळे हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघात यांसारख्या इतर गुंतागुंती निर्माण होऊ शकतात.कमी रक्तदाबाची कारणे काही औषधांपासून ते मधुमेहासारख्या आजारापर्यंत काहीही असू शकतात.औषधे उपयुक्त ठरू शकत असली, तरी कमी रक्तदाब असलेल्यांसाठी येथे काही सूचना आणि खाद्यपदार्थ दिले आहेत, जे तुमचा रक्तदाब एका निरोगी पातळीवर आणण्यास मदत करतील.

द्रवपदार्थांचे सेवन वाढवा

द्रवपदार्थांचे सेवन वाढवा

कमी रक्तदाब हा डिहायड्रेशनमुळे होऊ शकतो.तुमच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे रक्ताचे प्रमाण कमी होऊ शकते, ज्यामुळे रक्तदाब कमी होऊ शकतो.म्हणूनच, तुमचा रक्तदाब वाढवण्यासाठी, दिवसभर तुमच्या शरीरात पाण्याचे पुरेसे प्रमाण राखले जाईल याची खात्री करण्यासाठी तुम्हाला पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे.तुमच्या पाणी सेवनावर लक्ष ठेवण्यासाठी एक बाटली किंवा तक्ता ठेवा.तथापि, सोडा आणि साखरयुक्त पेयांपासून दूर राहा, कारण ती फायदेशीर असण्यापेक्षा अधिक हानिकारक असतात

मिठाचे सेवन वाढवा

मिठाचे सेवन वाढवा

मिठामुळे रक्तदाब वाढतो, ही सर्वश्रुत गोष्ट आहे.म्हणून, रक्तदाब वाढवण्यासाठी तुमच्या आहारात जास्त मिठाचा समावेश करा.कमी रक्तदाबाचा त्रास असलेल्या रुग्णांसाठी मिठाचे काही चांगले स्रोत म्हणजे ऑलिव्ह्ज, टूनासारखे मासे आणि पनीर.तुम्ही खारवलेले क्रॅकर्सही खाऊ शकता, तथापि, ट्रान्स फॅट्स आणि अतिरिक्त साखर कमी असलेले, आरोग्यदायी प्रकारच निवडण्याची खात्री करा.तुम्ही तुमच्या अन्नात अधिक मीठ घालत असाल, तर ते आयोडीनयुक्त आणि आरोग्यदायी टेबल सॉल्ट असल्याची खात्री करा.

कर्बोदकांचे सेवन कमी करा

कर्बोदकांचे सेवन कमी करा

सहज पचणाऱ्या अन्नामुळे रक्तदाबामध्ये अचानक घट होण्याची प्रवृत्ती असते.कर्बोदके साधारणपणे अत्यंत सहजपणे पचतात, म्हणूनच, ज्यांना कमी रक्तदाबाचा त्रास आहे, त्यांच्यासाठी ती एक अयोग्य निवड ठरेल. म्हणूनच, कमी रक्तदाबाचा त्रास असलेल्या रुग्णांनी कँडी, साखर, शीतपेये आणि पाव यांसारखे पदार्थ आहारातून वगळणे हितावह आहे.

जीवनसत्त्व बी-१२ असलेली अन्नपदार्थ समाविष्ट करा

जीवनसत्त्व बी-१२ असलेली अन्नपदार्थ समाविष्ट करा

शरीरात जीवनसत्त्व बी-१२ ची कमतरता ॲनिमियास कारणीभूत ठरू शकते, ज्यामुळे रक्तदाब कमी होऊ शकतो.रक्तदाब वाढवण्यासाठी तुम्ही तुमच्या दैनंदिन आहारात बी-१२ असलेले पदार्थ समाविष्ट करू शकता. कमी रक्तदाबाचा त्रास असलेल्या रुग्णांसाठी, या जीवनसत्त्वाने समृद्ध असलेल्या अन्नामध्ये अंडी, मांसाहार आणि पौष्टिक यीस्ट यांचा समावेश होतो. काही तृणधान्ये जीवनसत्त्व बी-१२ नेदेखील समृद्ध असतात. याव्यतिरिक्त, तुम्ही पूरक आहारदेखील घेऊ शकता.परंतु ते वापरण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

तुम्ही पुरेसे फोलेटचे सेवन करत आहात का?

तुम्ही पुरेसे फोलेटचे सेवन करत आहात का?

पुरेसे फोलेट न खाल्ल्याने अशक्तपणादेखील येऊ शकतो, ज्यामुळे रक्तदाब कमी होऊ शकतो.तुमच्या आहारात शतावरी, बीन्स आणि मसूर यांसारखे फोलेट जास्त असलेले पदार्थ समाविष्ट करा.फोलेट असलेली फळे रक्तदाब वाढवण्यात मदत करू शकतात. कमी रक्तदाबाच्या रुग्णांसाठी चांगली फळे म्हणजे लिंबू, संत्री आणि द्राक्ष.तसेच, तुमच्या आहारात पालेभाज्यांचा समावेश असल्याची खात्री करा.तुमच्या आहारात अंड्यांचा आणि कलेजीचा समावेश केल्याने भरपूर प्रमाणात फोलेट्स मिळू शकतात.

हायपोटेन्शन हा स्वतःहून उपचारयोग्य असला, तरी त्यामुळे अशा गुंतागुंती निर्माण होऊ शकतात, ज्यासाठी तज्ज्ञांची काळजी आणि रुग्णालयात दाखल होण्याची आवश्यकता भासू शकते.वैद्यकीय बिलांचा खर्च जास्त असू शकतो आणि त्यामुळे तुम्हाला आर्थिक ताण येऊ शकतो.म्हणूनच, सज्ज राहण्यासाठी आरोग्य विमा योजना बऱ्याच आधीच खरेदी करण्याचा सल्ला दिला जातो.तरतूद असेल्यास, तुम्ही तुमच्या विमा योजनेला गंभीर आजार संरक्षणही जोडू शकता.ते जीवन विमा योजनेला पूरक म्हणून काम करू शकते आणि गरजेच्या वेळी तुमचे संरक्षण करू शकते.

संबंधित लेख