मायक्रो टर्म अ‍ॅश्युरन्स प्लॅन | एसबीआय लाइफ ग्रामीण सुपर सुरक्षा
close

By pursuing your navigation on our website, you allow us to place cookies on your device. These cookies are set in order to secure your browsing, improve your user experience and enable us to compile statistics  For further information, please view our "privacy policy"

SBI Logo

Join Us

Tool Free 1800 22 9090

एसबीआई लाइफ – ग्रामीण सुपर सुरक्षा

UIN: 111N039V04

प्रॉडक्ट कोड : 96

एसबीआई लाइफ – ग्रामीण सुपर सुरक्षा

अधिक आनंदी जीवन
जगा किफायतशीर प्रीमियममध्ये.

एक ग्रुप, नॉन-लिंक्ड, नॉन-पार्टिसिपेटिंग, प्युअर रिस्क प्रीमियम, मायक्रो लाइफ इन्शुरन्स उत्पादन प्रॉडक्ट


आपण परवडणाऱ्या प्रीमियममध्ये आपल्या कर्मचाऱ्यांना लाइफ इन्शुरन्सचे संरक्षण देण्यास उत्सुक आहात का?


एसबीआय लाइफ – ग्रामीण सुपर सुरक्षा सह आपण आता परवडणार्‍या प्रीमियममध्ये आपल्या समूह सदस्यांना इन्शुरन्स संरक्षण देऊ शकता. हा प्लॅन आपल्या समूह सदस्यांना संभाव्य घटनेच्या बाबतीत त्यांच्या कुटुंबांच्या आर्थिक गरजा सुरक्षित करण्यात सक्षम करतो.


एसबीआय लाइफ – ग्रामीण सुपर सुरक्षा प्लॅन हे देऊ करतो –

  • सुरक्षितता – संभाव्य घटनेच्या बाबतीत आपल्या सदस्यांना कव्हर करा आणि त्यांच्या कुटुंबांना सुरक्षित करा
  • लवचिकता – प्रीमियम पेमेंट पर्याय निवडणे
  • सुलभता – सोप्या सामील होण्याच्या प्रक्रियेद्वारे
  • परवडणारे – वाजवी प्रीमियमसह

आपल्या समूह सदस्यांना सुरक्षेचे बक्षीस द्या.

ठळक वैशिष्ट्ये

एसबीआई लाइफ – ग्रामीण सुपर सुरक्षा

एक ग्रुप, नॉन-लिंक्ड, नॉन-पार्टिसिपेटिंग, प्युअर रिस्क प्रीमियम, मायक्रो लाइफ इन्शुरन्स उत्पादन प्रॉडक्ट

वैशिष्ट्ये

  • आपल्या समूह सदस्यांसाठी टर्म इन्शुरन्स
  • प्रीमियम भरण्यासाठी सिंगल किंवा नियमित वार्षिक पेमेंट पद्धतीचा पर्याय
  • कोणतीही वैद्यकीय तपासणी आवश्यक नाही
  • टर्म कव्हरचे
  • सिंगल प्रीमियम पॉलिसींसाठी (1 महिन्याच्या पटींमध्ये) 3 महिने ते 60 महिने
  • रेग्युलर प्रीमियम पॉलिसींसाठी (1 वर्षाच्या पटीमध्ये) 2 वर्षे ते 5 वर्षे

लाभ

सुरक्षितता
  • संभाव्य घटनेच्या बाबतीत आपल्या समूह सदस्यांच्या कुटुंबाच्या आर्थिक गरजा सुरक्षित करा.
लवचिकता
  • आपल्या सदस्यांना आपण देऊ इच्छिता ती आश्वस्त रक्कम निवडण्याचा पर्याय.
  • सिंगल प्रीमियम किंवा वार्षिक प्रीमियममध्ये प्रीमियम पेमेंटची निवड.
सुलभता
  • कोणतीही वैद्यकीय तपासणी आवश्यक नाही, स्वीकार करणे हे समाधानकारक आरोग्य घोषणेवर आधारित आहे.
परवडणारे
  • सामान्य प्रीमियममध्ये प्लॅन लाभ
कर लाभांचा आनंद घ्या*

मृत्यू लाभ :

पॉलिसीच्या मुदतीदरम्यान विमाकृताचा मृत्यू होण्याच्या दुर्दैवी प्रसंगात नामनिर्देशितास विमाकृत  रक्कम मिळेल, ज्यासाठी पॉलिसी कार्यान्वित असणे अध्याहृत.

परिपक्वतेचा लाभ:

हे प्युअर रिस्क उत्पादन असल्याने, या योजनेखाली कोणतेही परिपक्वता लाभ दिले जाणार नाहीत.

इतर माहिती

सरंडर
  • सरेंडर लाभ, कार्यान्वित पॉलिसींसाठी 12 महिने पूर्ण केल्यानंतर एक तर मास्टर पॉलिसीधारक किंवा वैयक्तिक विमाकृत सदस्याच्या विनंतीनुसार दिला जाईल. सरेंडर मूल्य 13 महिने किंवा अधिक पॉलिसी मुदतींसह जारी करण्यात आलेल्या सिंगल प्रीमियम पॉलिसींसाठी देय राहील
वाढीव कालावधी
  • नियमित प्रीमियम भरणा पॉलिसींसाठी, प्रीमियमच्या थकबाकी दिनांकापासून 30 दिवसांचा वाढीव कालावधी दिला जाईल.
पुनरूज्जीवन
  • नियमित प्रीमियम पेमेंट पद्धतीमध्ये, ग्रुपच्या सदस्याला पॉलिसीची मुदत संपायच्या आधी सदस्याच्या जीवन छत्राचे पुनरूज्जीवन करण्याचा पर्याय आहे. जे बोर्डाने अनुमती दिलेले अंडररायटिंग धोरण आणि लागू असेल त्या व्याजाच्या सापेक्ष राहील.
फ्री लूक कालावधी
  • ग्रुपचा सदस्य (ऐच्छिक स्कीम्सच्या बाबतीत)/मास्टर पॉलिसीधारक जर सर्टिफिकेट ऑफ इन्शुरन्स/मास्टर पॉलिसीच्या अटी आणि शर्तींबाबत समाधानी नसेल आणि त्याला जर काँट्रॅक्ट रद्द करायची इच्छा असेल तर, तो/ ती रद्द करण्याची कारणे नमूद केलेल्या पत्रासह डिस्टन्स मार्केटिंग आणि इलेक्ट्रॉनिक पॉलिसींच्या व्यतिरिक्त कोणत्याही अन्य चॅनेल मोडद्वारा सोर्स केलेल्या सर्टिफिकेट ऑफ इन्शुरन्स/मास्टर पॉलिसी ह्या पॉलिसीज् पोहोचल्याच्या तारखेपासून 15 दिवसांच्या आत आणि डिस्टन्स मार्केटिंग आणि इलेक्ट्रॉनिक पॉलिसींच्या द्वारा सोर्स केलेल्या सर्टिफिकेट ऑफ इन्शुरन्स/ मास्टर पॉलिसी ह्या पॉलिसीज्‌ पोहोचल्याच्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत पॉलिसी परत करू शकतात. भरलेला प्रीमियम इन्शुररने मेडिकल तपासण्यांवर काही खर्च केलेला असल्यास तो, स्टँप ड्यूटीचा खर्च आणि काही लागू असल्यास कर वजा करून परत केला जाईल. सदस्यांच्या संदर्भात कव्हरच्या कालावधीसाठी संबंधित प्रमाणातील रिस्क प्रीमियमची रक्कम देखील कापून घेतली जाईल.
कर्ज सुविधा
  • या योजनेखाली कर्ज सुविधा उपलब्ध नाही.
असमावेशने
  • आत्महत्येच्या दाव्यासाठीच्या तरतुदी
    विमाकृत समूह सदस्याने  सदस्याच्या पॉलिसी अंतर्गत जोखीम सुरू होण्याच्या/पुनरुज्जीवन होण्याच्या तारखेपासून 12 महिन्यांच्या आत आत्महत्या केल्याने मृत्युमुखी पडलेल्या समूह सदस्याला डेथ बेनिफिट्स देय नसतील. अशा प्रसंगी, निधनाच्या तारखेपर्यंत भरलेले एकूण प्रीमियम्स (लागू असलेले कर वजा जाता) किंवा निधनाच्या तारखेला उपलब्ध असलेली सरेंडर व्हॅल्यू (काही असल्यास), ह्यातील जास्त असणारी रक्कम, सदस्यासाठीच्या पॉलिसी अंतर्गत नामनिर्देशित व्यक्ती किंवा लाभार्थी, ह्यांना परत केली जाईल, ज्यासाठी मेंबरची पॉलिसी कार्यान्वित असणे गरजेचे आहे.

एसबीआय लाइफ – ग्रामीण सुपर सुरक्षाच्या जोखीम घटक, अटी आणि शर्तींवरील अधिक तपशीलांसाठी, खालील दस्तऐवज काळजीपूर्वक वाचा.

null
*वयाचे सर्व संदर्भ हे नुकत्याच झालेल्या वाढदिवसा रोजीच्या वय म्हणून असतात
^सर्व एसबीआय लाइफ समूह सूक्ष्म विमा उत्पादनांसाठी सकल विमाकृत रक्कम प्रत्येक जीवन (समूह सदस्यां)साठी, अधिकतम ₹ 2,00,000 असेल.

NW/96/ver1/05/22/WEB/MAR


*कर लाभ:
भारतातील प्रचलित प्राप्तिकर कायद्यांच्या अनुसार आपण कर लाभासाठी/त्यातून वगळले जाण्यासाठी पात्र ठरता, असे कायदे वेळोवेळी बदलू शकतात. अधिक तपशीलांसाठी आपण आमच्या वेबसाइटला इथे भेट देऊ शकता .

विक्री व्यवहार पूर्ण करण्यापूर्वी जोखमीचे घटक, अटी आणि शर्तीं यांच्या अधिक तपशिलांसाठी कृपया विक्री माहिती पुस्तिका काळजीपूर्वक वाचा.