एक इंडिविज्युअल, नॉन-लिंक्ड, नॉन-पार्टिसिपेटिंग लाइफ इन्शुरन्स प्युअर रिस्क प्रीमियम उत्पादन
तुमच्या कुटुंबाचं भवितव्य सुरक्षित करायचा भार तुमच्या खांद्यावरून तुमच्या बोटांशी सरकवा. एसबीआय लाइफ - इशील्ड आता तुम्हाला देत आहे जीवन विमा मिळवण्याच्या सोप्या आणि अखंड ऑनलाइन प्रक्रियेचा फायदा.
तुमच्या कुटुंबाचं भवितव्य सुरक्षित करायचा भार तुमच्या खांद्यावरून खाली सरकवा. एसबीआय लाइफ - ईशील्ड आता तुम्हाला देत आहे जीवन विमा मिळवण्याच्या सोप्या आणि अखंड ऑनलाइन प्रक्रियेचा फायदा.
कुटुंबासाठी आर्थिक सुरक्षेच्या शोधात असलेल्यांना, एसबीआय लाइफ - ईशील्ड, परवडणाऱ्या प्रीमियममध्ये बेनिफिट्सची श्रेणी देऊ करते.
ह्या ऑनलाइन प्युअर टर्म प्लॅन मध्ये मिळते -
सुरक्षा - तुमच्या कुटुंबाला आर्थिक सुरक्षेची खात्री देण्यासाठी
लवचिकता - दोन बेनिफिट स्ट्रक्चर्स आणि दोन रायडर पर्यायांमधून निवड
साधेपणा - सोप्या ऑनलाइन प्रोसेस सह
परवडण्याची क्षमता - वाजवी प्रीमियम्स द्वारा
विश्वसनीयता - सेकंड ओपिनियनसह
केवळ काही क्लिक्सनी विमा उतरवा आणि तुमच्या कुटुंबाला सुरक्षा बहाल करा!
हा प्लॅन दोन बेनिफिट स्ट्रक्चर्स देतो - लेव्हल कव्हर बेनेफिट आणि इन्क्रीजिंग कव्हर बेनिफिट. 'ॲक्सिलरेटेड टर्मिनल इलनेस' लाभ$ हा दोन्ही संरचनांसाठी उपलब्ध आहे.
लेव्हल कव्हर बेनेफिट :
ह्या स्ट्रक्चरमध्ये पॉलिसीच्या संपूर्ण मुदतभर सम ॲश्युअर्ड समान राहते
तुम्हाला टर्मिनल इलनेसच्या बाबतीत संरक्षण मिळते#
पॉलिसीच्या मुदतीमध्ये, दुर्दैवाने निधन झाल्यास किंवा प्राणघातक (गंभीर स्वरूपाचा/ जिवावर बेतू शकणारा) आजाराचे निदान झाल्यास#, ह्यापैकी जे आधी घडेल, तेव्हा "सम ॲश्युअर्ड ऑन डेथ" चुकती केली जाईल, ज्यासाठी पॉलिसी कार्यान्वित असणे गरजेचे आहे आणि ती खंडित केली जाईल.
जिथे "सम ॲश्युअर्ड ऑन डेथ" ही खालीलपैकी अधिक असणारी रक्कम असेल :
वार्षिकीकृत प्रीमियमच्या 10 पट**, किंवा
मृत्यूच्या तारखेपर्यंत पोहोचलेल्या एकूण प्रीमियम्सच्या^ 105% किंवा
मृत्युपश्चात देय असणारी ॲश्युअर्ड एबसोल्यूट अमाऊंट, जी मृत्यूच्या तारखेला असलेल्या 'इफेक्टिव सम ॲश्युअर्ड## एवढी आहे.
##लेव्हल कव्हर बेनिफिटसाठी मृत्यूच्या तारखेला असलेली 'इफेक्टिव सम ॲश्युअर्ड' ही स्वीकारलेल्या प्रारंभिक 'सम ॲश्युअर्ड' एवढी आहे.
इन्क्रीजिंग कव्हर बेनिफिट :
ह्या स्ट्रक्चरमध्ये पॉलिसीच्या संपूर्ण मुदतभर 'सम ॲश्युअर्ड' प्रत्येक 5व्या पॉलिसी वर्षाच्या अखेरीस 10% सरळ व्याज दराने आपोआप वाढते.
तुम्हाला टर्मिनल इलनेसच्या बाबतीत संरक्षण मिळते#
पॉलिसीच्या मुदतीमध्ये, दुर्दैवाने निधन झाल्यास किंवा प्राणघातक (गंभीर स्वरूपाचा/ जिवावर बेतू शकणारा) आजाराचे निदान झाल्यास#, ह्यापैकी जे आधी घडेल, तेव्हा त्या पॉलिसी वर्षासाठीची "सम ॲश्युअर्ड ऑन डेथ" चुकती केली जाईल, ज्यासाठी कार्यान्वित असणे गरजेचे आहे आणि ती खंडित केली जाईल.
जिथे "सम ॲश्युअर्ड ऑन डेथ" ही खालीलपैकी जास्त असणारी रक्कम असेल :
वार्षिकीकृत प्रीमियमच्या 10 पट**, किंवा
मृत्यूच्या तारखेपर्यंत पोहोचलेल्या एकूण प्रीमियम्सच्या^ 105% किंवा
मृत्युपश्चात देय असणारी ॲश्युअर्ड एबसोल्यूट अमाऊंट, जी मृत्यूच्या तारखेला असलेल्या 'इफेक्टिव सम ॲश्युअर्ड##' एवढी आहे.
~~इन्क्रीजिंग लेव्हल कव्हर बेनिफिटसाठी मृत्यूच्या तारखेला असलेली 'इफेक्टिव सम ॲश्युअर्ड##' ही मृत्यूच्या तारखेच्या आधीच्या प्रत्येक 5व्या वर्षाच्या अखेरीस 10% सरळ व्याज दराने वाढून, स्वीकारलेल्या प्रारंभिक ‘सम ॲश्युअर्ड’ एवढी असेल.
#टर्मिनल इलनेस म्हणजेच अशा आजाराचे निर्णायक निदान, ज्यामध्ये जीवन विमा उतरवलेल्या व्यक्तीचे 180 दिवसांच्या आत निधन होणे अपेक्षित आहे.
**वार्षिकीकृतप्रीमियम म्हणजे अंडरराइट केलेले एक्स्ट्रा प्रीमियम्स आणि मोडल प्रीमियम्ससाठी, जर काही लोडिंग्ज असतील तर ते अंडरराइट करून कर आणि रायडर प्रीमियम्स वगळता, पॉलिसीधारकाने निवडलेल्या एका पॉलिसी वर्षात देय असलेला प्रीमियम.
^टोटलप्रीमियम्स म्हणजे कोणताही एक्स्ट्रा प्रीमियम, कोणताही रायडर प्रीमियम आणि कर वगळता मिळालेल्या सर्व प्रीमियम्सची एकूण रक्कम.
पॉलिसीधारकाने त्या तारखेपर्यंत सर्व रेग्युलर प्रीमियम्स भरलेले असतील आणि जीवन विमा उतरवलेल्या व्यक्तीच्या मृत्यूच्या तारखेला पॉलिसी कार्यान्वित असेल तरच डेथ बेनिफिट दिला जातो.
$एक्सिलरेटेड टर्मिनल इलनेस बेनिफिट :
हा अंतर्भूत लाभ दोन्ही संरचनांसाठी उपलब्ध आहे.
जीवन विमा उतरवलेल्या व्यक्तीला टर्मिनल इलनेसचे निदान झाल्यावर, डेथ बेनिफिट एवढी रक्कम दिली जाईल आणि पॉलिसी बंद होईल
तुम्ही जर त्या तारखेपर्यंत तुमचे सर्व रेग्युलर प्रीमियम्स भरलेले असतील आणि तुमच्या निदानाच्या तारखेला पॉलिसी कार्यान्वित असेल तरच एक्सिलरेटेड टर्मिनल इलनेस बेनिफिट देय राहील. टर्मिनल इलनेस क्लेमचा परिणाम म्हणून पॉलिसी खंडित केली जाईल.
टर्मिनल इलनेस म्हणजेच अशा आजाराचे निर्णायक निदान, ज्यामध्ये जीवन विमा उतरवलेल्या व्यक्तीचे 180 दिवसांच्या आत निधन होणे अपेक्षित आहे.
मेडिकल सेकंड ओपिनियन :
मेडिकल सेकंड ओपिनियन ही एक सर्विस (सेवा) आहे, जी जीवन विमा उतरवलेल्यांना त्यांच्या निदानाचे सेकंड ओपिनियन आणि दुसऱ्या डॉक्टरांकडून उपचार मिळणे शक्य करून देते.
लेवल कवर बेनिफिट आणि इन्क्रीजिंग कवर बेनिफिट ह्या दोन्ही संरचनांसाठी उपलब्ध आहे, ज्यासाठी कार्यान्वित असणे गरजेचे आहे.
मॅच्युरिटी बेनिफिट (मुदतपूर्ती लाभ) :
हा प्लॅन तुम्हाला मॅच्युरिटी बेनेफिट पुरवत नाही..
रायडर बेनिफिट:
एसबीआय लाइफ - एक्सिडेंटल डेथ बेनिफिट रायडर (UIN: 111B015V03) - रायडरच्या मुदती दरम्यान घडलेल्या अपघाताची परिणती म्हणून, जीवन विमा उतरवलेल्या व्यक्तीचा अपघात घडल्यापासून 120 दिवसांच्या आत मृत्यू झाल्यास, रायडर सम ॲश्युअर्ड देय आहे, ज्यासाठी रायडर पॉलिसी कार्यान्वित असणे गरजेचे आहे.
एसबीआय लाइफ - एक्सिडेंटल टोटल अँड पर्मनंट डिसअॅबिलिटी बेनिफिट रायडर (UIN: 111B016V03) - रायडरच्या मुदती दरम्यान जीवन विमा उतरवलेल्या व्यक्तीला अपघातामुळे संपूर्ण आणि कायम स्वरूपी अपंगत्व आल्यास रायडर सम ॲश्युअर्ड देय आहे, ज्यासाठी रायडर पॉलिसी कार्यान्वित असणे गरजेचे आहे.
एसबीआय लाइफ - ईशील्डच्या जोखमीच्या घटकांचे अधिक तपशील, अटी आणि शर्ती जाणून घेण्यासाठी, खालील दस्तऐवज काळजीपूर्वक वाचा.
^वयासंबंधीचे सर्व संदर्भ हे मागील वाढदिवसाचे वय आहेत.
$$वर दाखवलेले प्रीमियम लागू कर वगळता आणि अतिरिक्त अंडरराइट करून आहेत. कर हे प्रचलित कर कायद्यांच्या अनुसार लागू होतील.
1G.ver.02-04-21 WEB MAR
विक्री व्यवहार पूर्ण करण्यापूर्वी जोखमीचे घटक, अटी आणि शर्तीं ह्यांच्या अधिक तपशीलांसाठी कृपया विक्री माहितीपत्रक काळजीपूर्वक वाचा.
जोखमीचे घटक, अटी आणि रायडर्स शर्तीं ह्यांच्या अधिक तपशीलांसाठी कृपया रायडर माहितीपत्रक काळजीपूर्वक वाचा.
*कर लाभ:
कर लाभ हे प्राप्तिकर कायद्याच्या अनुसार आहेत आणि ते वेळोवेळी बदलणे सापेक्ष आहे. तपशिलांसाठी तुमच्या कर सल्लागारासोबत सल्ला मसलत करा. अधिक तपशीलांसाठी तुम्ही आमच्या वेबसाइटला येथे विजिट करू शकता. तपशिलांसाठी तुमच्या कर सल्लागारासोबत सल्ला मसलत करा.