युलिप योजना ऑनलाईन - एसबीआय लाइफ ईवेल्थ युलिप योजना खरेदी करा
close

By pursuing your navigation on our website, you allow us to place cookies on your device. These cookies are set in order to secure your browsing, improve your user experience and enable us to compile statistics  For further information, please view our "privacy policy"

SBI Logo

Join Us

Tool Free 1800 22 9090

एसबीआय लाइफ – ईवेल्थ इन्शुरन्स

UIN: 111L100V03

प्रॉडक्ट कोड: 1Q

एसबीआय लाइफ – ईवेल्थ इन्शुरन्स

साध्या मार्गाने तुमच्या
संपत्तीमध्ये वाढ
घडवणारा एक प्लॅन.

Calculate Premium

एक इंडिविज्युअल, नॉन-पार्टिसिपेटिंग युनिट लिंक्ड लाइफ इन्शुरन्स उत्पादन


"युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्रॉडक्ट्स ही कराराच्या पहिल्या पाच वर्षांमध्ये कोणतीही लिक्विडीटीची सुलभता देऊ करत नाहीत. पॉलिसीधारक पाचव्या वर्षाच्या अखेरीपर्यंत ‘लिंक्ड इन्शुरन्स प्रॉडक्ट्स’ मध्ये गुंतवलेले पैसे पूर्णपणे वा अंशत: सरेंडर करू शकत नाहीत".


खरेदी करण्याची किचकट प्रक्रिया तुम्हाला युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन्समध्ये गुंतवणूक करण्यापासून परावृत्त करते आहे का?​


आता तुम्ही एका सोप्या केलेल्या 3 टप्प्याच्या ऑनलाइन खरेदी प्रक्रियेसह युलिपच्या लाभांचा आनंद मिळवू शकता. एसबीआय लाइफ - ईवेल्थ इन्शुरन्स तुम्हाला न केवळ तुमच्या कुटुंबाचे भवितव्य सुरक्षित करायला मदत करतो तर तुमची संपत्तीही वाढवतो.


हा वेल्थ प्लॅन तुम्हाला देतो -

  • सुरक्षा - आकस्मिक काही घडल्यास तुमच्या कुटुंबाच्या गरजांसाठी विमाछत्र
  • परवडणारा - प्रीमियम्स प्रति महिना रु. 2000 पासून सुरू
  • लवचिकता - दोन प्लॅन ऑप्शन्समधून निवड करण्याची
  • साधेपणा - सहजपणे ऑनलाइन अर्ज करा
  • तरलता – 6व्या पॉलिसी वर्षापासून अंशत: पैसे काढता येतात 
 

केवळ काही क्लिक्सनी इन्शुरन्स आणि संपत्ती निर्मितीकडे काही पावलं टाका.

ठळक वैशिष्ट्ये

एसबीआय लाइफ – ईवेल्थ इन्शुरन्स

नॉन-पार्टिसिपेटिंग ऑनलाइन युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन

आता खरेदी करा

वैशिष्ट्ये

  • जीवन विमाछत्र
  • ऑटोमेटिक ॲसेट ॲलोकेशन द्वारा गुंतवणुकीचे व्यवस्थापन
  • दोन प्लॅनचे ऑप्शन्स – ग्रोथ आणि बॅलन्स्ड
  • सोपी केलेली 3 टप्प्यांची ऑनलाइन खरेदी प्रक्रिया
  • कोणत्याही ॲलोकेशन चार्जशिवाय नाममात्र प्रीमियम पेमेंट्स
  • 6व्या पॉलिसी वर्षापासून अंशत: पैसे काढण्याची सुविधा   

फायदे

सुरक्षा
  • आकस्मिक काही घडले असता तुमच्या कुटुंबाचे आर्थिक स्वातंत्र्य अबाधित राहील ह्याची खात्री करून घ्या
  • मार्केटमधील चढउतारांना सामोरे जाण्यासाठी तुमच्या फंड्स आपोआप पुनर्संतुलित होता.
लवचीकता
  • तुमच्या जोखीम-क्षमतेच्या अनुसार तुमच्या पसंतीच्या प्लॅन-ऑप्शनमध्ये गुंतवणूक करा.
साधेपणा
  • खरेदीची विना-व्यत्यय ऑनलाइन प्रक्रिया
परवडण्याची क्षमता
  • कोणत्याही ॲलोकेशन चार्जेस रु.2,000 इतक्या कमी प्रीमयिमसाठी मार्केट-लिंक्ड उत्पन्न मिळवा
तरलता
  • कोणत्याही अनपेक्षित खर्चांसाठी अंशत: रक्कम काढण्याचे स्वातंत्र्य मिळवा.

कर लाभांचा आनंद घ्या*

मॅच्युरिटी बेनिफिट (फक्त कार्यान्वित पॉलिसींसाठीच लागू):
पॉलिसीची मुदत पूर्ण झाल्यानंतर, फंड व्हॅल्यू चुकती केली जाईल.


डेथ बेनिफिट (मृत्यू लाभ) (फक्त कार्यान्वित पॉलिसींसाठीच लागू) :
कंपनीला डेथ क्लेम मिळाल्याच्या तारखेला (फंड व्हॅल्यू किंवा सम ॲश्युअर्ड वजा लागू असणार्‍या अंशतः काढलेल्या रकमा@ किंवा निधनाच्या तारखेपर्यंत मिळालेल्या एकूण प्रीमियम्सच्या 105% वजा लागू असणार्‍या अंशतः काढलेल्या रकमा@ ह्यातील) जास्त असणारी रक्कम लाभार्थीला देय राहील.

@लागू असणार्‍या अंशतः काढलेल्या रक्कमा म्हणजे, लाइफ ॲश्युअर केलेल्या व्यक्तीच्या निधनाच्या आधीच्या 2 वर्षांमध्ये काढलेल्या ज्या काही अंशतः रक्कमा असतील त्या होय.

एसबीआय लाइफ - ईवेल्थ इन्शुरन्सच्या जोखमीच्या घटकांचे अधिक तपशील, अटी आणि शर्ती जाणून घेण्यासाठी, खालील दस्तऐवज काळजीपूर्वक वाचा.  
null
#वयासंबंधीचे सर्व संदर्भ हे मागील वाढदिवसाचे वय आहेत.
^जिथे ॲन्युअलाइज्ड प्रीमियम म्हणजे लागू असणारे कर वजा जाता एका वर्षामध्ये देय असणारी प्रीमियमची रक्कम आहे.

टीप :
  • 1. लाइफ ॲश्युअर केलेली व्यक्ती जर अल्पवयीन असेल तर, पॉलिसीची मुदत योग्य प्रकारे निवडायला हवी, अशी की लाइफ ॲश्युअर केलेली व्यक्ती मुदतपूर्तीच्या तारखेला किमान सज्ञान असेल.
  • 2. ज्याच्या जीवनासाठी विमा उतरवला तो/ती जर अल्पवयीन असतील, तर पॉलिसी सुरू होण्याची तारीख आणि जोखीम सुरू होण्याची तारीख समान असेल आणि पॉलिसीधारक/ प्रस्तावकर्ता हे पालक, आजीआजोबा किंवा कायदेशीर पालक असू शकतात. हे बोर्डाने अनुमती दिलेल्या अंडररायटिंग पॉलिसीच्या अनुसार असेल.
  • 3. ह्या पॉलिसीमध्ये टॉप अप प्रीमियम्सना अनुमती नाही.

NW/1Q/ver1/04/22/WEB/MAR

**परताव्याचे प्रती वर्ष @4% आणि @8% हे दर हे सर्व लागू चार्जेस विचारात घेतल्यानंतर, फक्त उदाहरणार्थ परीस्थितीबद्दल आहेत. ह्यांची हमी देण्यात येत नाही आणि ते परताव्याची सर्वात अधिक किंवा कमी मर्यादाही नव्हेत. युनिट लिंक्ड लाइफ इन्शुरन्स उत्पादने ही मार्केटच्या जोखमींच्या आधीन आहेत. या करारांअंतर्गत देऊ करण्यात येणारे विविध फंड ही फंडांची नावे असून ती ह्या प्लॅन्सचा दर्जा, त्यांची भावी वाटचाल आणि उत्पन्ने ह्यांचे कोणत्याही प्रकारे निर्देशन करीत नाहीत.


'फंड मॅनेजमेंट चार्जेस’ असे विविध शुल्क कापून घेतलेले आहेत. शुल्क आणि त्यांचे कामकाज, ह्यांच्या संपूर्ण माहितीसाठी कृपया विक्री माहिती पुस्तिका वाचा


युनिट लिंक्ड लाइफ इन्शुरन्स उत्पादने ही पारंपरिक लाइफ इन्शुरन्स उत्पादनांपेक्षा वेगळी आहेत आणि मार्केट जोखमीच्या आधीन आहेत. युनिट लिंक्ड लाइफ इन्शुरन्स पॉलिसीमध्ये भरणा करण्यात येणारे प्रीमियम भांडवली बाजाराशी निगडित गुंतवणुकीच्या जोखमींशी संबंधित असतात आणि फंडाची कामगिरी व भांडवली बाजारावर परिणाम करणार्‍या घटकांच्या आधारावर युनिट्सचे एनएव्ही मूल्य कमी किंवा अधिक होऊ शकते. आणि विमा घेणारी व्यक्ती त्याच्या/तिच्या निर्णयांसाठी जबाबदार राहील. एसबीआय लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड हे इन्शुरन्स कंपनीचे फक्त नाव आहे आणि एसबीआय लाइफ - ईवेल्थ इन्शुरन्स हे युनिट लिंक्ड लाइफ इन्शुरन्सचे फक्त नाव असून काँट्रॅक्टचा दर्जा, त्याची भावी वाटचाल किंवा उत्पन्ने ह्यांचे ती कोणत्याही प्रकारे निर्देशन करीत नाहीत. तुमच्या विमा सल्लागाराबरोबर किंवा मध्यस्थ किंवा इन्शुरन्सच्या पॉलिसी दस्तावेजाद्वारा संबंधित जोखमी आणि लागू आकार यांची माहिती करून घ्या. या उत्पादनांत अंतर्गत देऊ करण्यात येणारे विविध फंड ही फंडांची नावे असून ती ह्या प्लॅन्सचा दर्जा, त्यांची भावी वाटचाल आणि उत्पन्ने ह्यांचे कोणत्याही प्रकारे निर्देशन करीत नाहीत. फंड पर्यायाची गतकालीन कामगिरी ही भावी कामगिरी निर्देशीत करत नाही. ह्या पॉलिसीच्या अंतर्गत देय असणारे सर्व लाभ हे कर कायद्यांच्या आणि वेळोवेळी करण्यात येणाऱ्या अन्य कायद्यांच्या आधीन आहेत, तपशीलांसाठी आपल्या कर सल्लागारासोबत सल्लामसलत करा.


विक्री व्यवहार पूर्ण करण्यापूर्वी जोखमीचे घटक, अटी आणि शर्तीं यांच्या अधिक तपशिलांसाठी कृपया विक्री माहिती पुस्तिका काळजीपूर्वक वाचा.

 

*कर लाभ:
कराचे लाभ आयकर कायद्यानुसार आहेत आणि ते वेळोवेळी बदलू शकतात. अधिक तपशीलांसाठी कृपया आपल्या कर सल्लागाराचा सल्ला घ्या. तपशीलांसाठी कृपया तुमच्या ’कर सल्लागारा’बरोबर सल्लामसलत करा.

भारतातील प्रचलित प्राप्तिकर कायद्यांच्या अनुसार तुम्ही कर लाभासाठी/ कर मधून वगळले जाण्यासाठी पात्र ठरता, असे कायदे वेळोवेळी बदलू शकतात. अधिक तपशीलांसाठी, इथे क्लिक करा. तपशिलांसाठी तुमच्या कर सल्लागाराबरोबर सल्लामसलत करा.