Smart Bachat Plus - Best Endowment Assurance Plan | SBI Life Insurance
SBI Logo

Join Us

Tool Free 1800 22 9090

एसबीआय लाइफ - स्मार्ट बचत प्लस

UIN: 111N170V01

Product Code: 4A

play icon play icon
SBI Life Smart Bachat Plus Premium Details

भावी काळ
तुम्हाला हवा तसा
जगा बचतीच्या
आश्वासनासह.

एक इंडिविज्युअल, नॉन-लिंक्ड, पार्टिसिपेटिंग, लाइफ इन्शुरन्स, सेव्हिंग्ज प्रॉडक्ट

आपली स्वत:ची स्वप्ने आणि आकांक्षा लक्षात ठेवणे खूपच महत्वाचे आहे. त्यांची पूर्तता केल्यामुळे आपल्याला आनंद आणि धन्यताही वाटते, ज्याचा फायदा न केवळ आपल्याला तर आपल्या जीवलगांनाही होतो. मग ती एखादी ड्रीम व्हेकेशन, एखाद्या छंदाची जोपासना किंवा आपल्या मनोदयांमधील काहींची पूर्तता असो, आपल्या लक्ष्यांना प्राधान्य देण्यासाठी वेळ दिल्यामुळे जीवन अधिक संतुलित होते आणि सार्थकी लागते.

एसबीआय लाइफमध्ये, तुमच्या गरजांना साजेशी लाइफ इन्शुरन्स प्रॉडक्ट्स पुरवण्यासाठी आम्ही समर्पित आहोत. सेव्हिंग्जसह तुमच्या लाइफ इन्शुरन्सच्या गरजांच्या पूर्ततेसाठी आम्ही तुम्हाला सादर करत आहोत, एसबीआय लाइफ - स्मार्ट बचत प्लस, जो आहे एक इंडिविज्युअल, नॉन-लिंक्ड, पार्टिसिपेटिंग, लाइफ इन्शुरन्स, सेव्हिंग्ज प्रॉडक्ट. ह्या प्रॉडक्टमध्ये उपलब्ध असलेल्या लाइफ किंवा लाइफ प्लस विथ इन-बिल्ट अ‍ॅक्सिडेंटल डेथ अँड अ‍ॅक्सिडेंटल टोटल पर्मनंट डिसअ‍ॅबिलिटी (AD& ATPD) बेनिफिट, ह्या दोन बेनिफिट ऑप्शन्सपैकी एक तुम्ही निवडू शकता. तसेच हा तुम्हाला तुम्ही आणि तुमचे कुटुंब दोघांच्याही जीवनातील प्रत्येक टप्प्यांवरच्या लक्ष्यांसाठी तुमच्या गरजांच्या अनुसार, तुमची प्रीमियम भरण्याची मुदत आणि पॉलिसीची मुदत निवडण्यासाठी परिवर्तनशीलता देखील देतो. पार्टिसिपेटिंग प्लॅन असल्यामुळे, कंपनीच्या 'पार्टिसिपेटिंग लाइफ इन्शुरन्स बिझनेस' मध्ये उदयाला येणाऱ्या नफ्यांमधील एक हिस्सा मिळण्यासाठीही रीव्हर्शनरी बोनस आणि जाहीर झाल्यास, टर्मिनल बोनस मिळण्यासाठी तुम्ही पात्र आहात.

ठळक वैशिष्ट्ये

SBI Life Smart Bachat Plus

Individual, Non-linked, Participating Endowment Assurance Plan

plan profile

Nikhil, a working professional, has chosen this insurance plan to not only financially secure his family in case of an eventuality but also to safeguard his future.

Fill in the form fields below to get a snapshot of how SBI Life – Smart Bachat will benefit you.

Name:

DOB:

Gender:

Male Female Third Gender

Staff:

Yes No

Choose your policy term...

Plan

Option A (Life)

Option B (Life Plus)

Channel Type

Premium Payment Option

Policy Term

15 30

A little information about the premium options...

Premium Frequency

Sum Assured

2 Lakh No limit

Premium Paying Term


Reset
sum assured

Sum Assured


premium frequency

Premium frequency

Premium amount
(excluding taxes)


premium paying

Premium Payment Term


policy term

Policy Term


maturity benefits

Maturity Benefit

At assumed rate of returns** @ 4%


or
@ 8%

Give a Missed Call

वैशिष्ट्ये

  • तुमच्या इन्शुरन्सच्या गरजांच्या अनुसार ह्या 2 बेनिफिट ऑप्शन्समधून एक निवडा
    • ऑप्शन ए: लाइफ - हा बेनिफिट ऑप्शन नियमित रीव्हर्शनरी बोनसेससह लाइफ कव्हर आणि सेव्हिंग्ज पुरवतो.
    • ऑप्शन बी: लाइफ प्लस - लाइफ बेनिफिट ऑप्शन मध्ये मिळणाऱ्या बेनिफिट्सच्या व्यतिरिक्त, हा बेनिफिट ऑप्शन, पॉलिसीच्या मुदतीतील अ‍ॅक्सिडेंटल डेथ अँड अ‍ॅक्सिडेंटल टोटल पर्मनंट डिसअ‍ॅबिलिटी ह्यावर अतिरिक्त कव्हरेज पुरवतो.
  • मुदतपूर्तीला 'सम अ‍ॅश्युअर्ड ऑन मॅच्युरिटी + व्हेस्टेड रीव्हर्शनरी बोनसेस + जाहीर झाल्यास, टर्मिनल बोनस' एवढा एकरकमी बेनिफिट
  • तुमच्या पॉलिसीच्या संपूर्ण मुदतभर किंवा काळाच्या एका मर्यादित अवधीसाठी प्रीमियम भरण्याची परिवर्तनशीलता
  • प्राप्तिकर अधिनियम, 1961च्या अंतर्गत प्रचलित मानदंडांच्या अनुसार कर लाभ$मिळवा

*भारतातील लागू असलेल्या प्राप्तिकर कायद्यांच्या अनुसार तुम्ही प्राप्तिकर लाभांसाठी पात्र ठरू शकता, जे वेळोवेळी बदलू शकतात. तुम्हाला असे सुचवण्यात येते की पॉलिसीमध्ये लागू असणाऱ्या कर लाभांबाबत तुमच्या टॅक्स अ‍ॅडवायजरचा सल्ला घ्यावा.

फायदे:

सुरक्षा:

  • पॉलिसीच्या मुदतीमध्ये लाइफ कव्हरद्वारे सुरक्षा.

परिवर्तनशीलता:

  • तुमच्या पॉलिसीच्या संपूर्ण मुदतभर प्रीमियम्स भरा (रेग्युलर पे) किंवा मर्यादित कालावधीसाठी भरा (एलपीपीटी 7/10/15 वर्षे)

सुलभता

  • एका साध्या अर्ज प्रक्रियेसह आणि विना-अडथळा जारी करण्यासह सहज खरेदी करा.

विश्वसनीयता:

  • ‘सम अ‍ॅश्युअर्ड ऑन मॅच्युरिटी + व्हेस्टेड रिव्हर्शनरी बोनसेस + जाहीर झाल्यास, टर्मिनल बोनस’ एवढा एकरकमी मुदतपूर्तीचा लाभ मिळवा

डेथ बेनिफिट

  1. तुम्ही जर ‘लाइफ’ बेनिफिट ऑप्शन स्वीकारला असेल आणि लाइफ ॲश्युअर्डच्या निधनाच्या तारखेला पॉलिसी कार्यान्वित असेल, तर पुढीलपैकी अधिक असलेली रक्कम देय राहील:
    1. ए. सम ॲश्युअर्ड ऑन डेथ अधिक व्हेस्टेड रिव्हर्शनरी बोनसेस अधिक टर्मिनल बोनस, जाहीर केला असल्यास किंवा
    2. बी. मृत्यूच्या तारखेपर्यंत भरलेल्या एकूण प्रीमियम्सच्या 105%

    जिथे;
    सम ॲश्युअर्ड ऑन डेथ ही सम ॲश्युअर्ड किंवा वार्षिकीकृत प्रीमियमच्या 11 पट ह्यातील जास्त असणारी रक्कम असेल.
    वार्षिकीकृत प्रीमियम म्हणजे जे कर, रायडर प्रीमियम्स, अंडररायटिंग एक्स्ट्रा प्रीमियम्स आणि मोडल प्रीमियम्ससाठीची लोडिंग्ज वगळता, एका वर्षामध्ये देय असणारी प्रीमियमची रक्कम असेल.
    भरलेले एकूण प्रीमियम्स म्हणजे उघडपणे गोळा केलेले कोणतेही अतिरिक्त प्रीमियम आणि कर वगळता, बेस प्रॉडक्टमध्ये भरलेले एकूण प्रीमियम्स.
  2. तुम्ही जर ‘लाइफ प्लस’ बेनिफिट ऑप्शन स्वीकारला असेल आणि लाइफ ॲश्युअर्डच्या अपघात व्यतिरिक्त कारणांमुळे झालेल्या निधनाच्या तारखेला पॉलिसी जर कार्यान्वित असेल तर, वर मुद्दा (i) मध्ये उल्लेखलेली रक्कम देय असेल.
  3. तुम्ही जर ‘लाइफ प्लस’ बेनिफिट ऑप्शन स्वीकारला असेल आणि लाइफ आणि लाइफ ॲश्युअर्डच्या ॲक्सीडेंटल डेथला कारणीभूत ठरणारा अपघात घडलेल्या निधनाच्या तारखेला पॉलिसी कार्यान्वित असेल, तर पुढीलपैकी अधिक असलेली रक्कम देय राहील:
    1. ए. वरील मुद्दा (i) मध्ये उल्लेखलेली रक्कम
      अधिक
    2. बी. सम ॲश्युअर्ड एवढी अतिरिक्त रक्कम देय राहील.

डेथ बेनिफिट दिल्यानंतर पॉलिसी खंडित होईल आणि त्या पॉलिसीमध्ये मिळणारे आणखी लाभ उपलब्ध होणार नाहीत.

ॲक्सीडेंटल टोटल पर्मनंट डिसॲबिलिटी बेनिफिट (फक्त ‘लाइफ प्लस’ बेनिफिट ऑप्शनमध्येच उपलब्ध)

तुम्ही जर ‘लाइफ प्लस’ बेनिफिट निवडला असेल आणि ज्याची परिणती टोटल पर्मनंट डिसॲबिलिटी येण्यात झाली त्या अपघाताच्या तारखेला पॉलिसी जर कार्यान्वित असेल तर, सम ॲश्युअर्ड एवढी रक्कम देय असेल शिवाय पॉलिसीमध्ये देय असणारे भावी प्रीमियम्स (असल्यास) ते माफ केले जातील.

ॲक्सीडेंटल टोटल पर्मनंट डिसॲबिलिटी बेनिफिट दिल्यांनतर, पॉलिसी ॲक्सीडेंटल डेथ आणि ॲक्सीडेंटल टोटल पर्मनंट डिसॲबिलिटी (AD&ATPD) शिवाय सुरू राहील.

मॅच्युरिटी बेनिफिट:

पॉलिसी कार्यान्वित असल्यास आणि लाइफ ॲश्युअर्ड पॉलिसीची मुदत संपेपर्यंत हयात असल्यास, पॉलिसीच्या मुदतीच्या अखेरीला सम ॲश्युअर्ड ऑन मॅच्युरिटी अधिक व्हेस्टेड रिव्हर्शनरी बोनसेस आणि (जाहीर झाला असल्यास) टर्मिनल बोनस एवढी रक्कम देय राहील.
जिथे, सम ॲश्युअर्ड ऑन मॅच्यारिटी ही सम ॲश्युअर्ड एवढी असेल.
एसबीआय लाइफ - स्मार्ट बचत प्लसच्या अटी आणि शर्तींच्या जोखीम घटकावरील अधिक तपशीलांसाठी, खालील दस्तऐवज काळजीपूर्वक वाचा.
SBI Life Smart Bachat Plus Plan
^वयासंबंधीचे सर्व संदर्भ हे मागील वाढदिवसाचे वय आहे.
^^वरील किमान प्रीमियम रकमा, कर आणि काही असल्यास अंडररायटिंग लोडिंग वगळून आहेत. प्रचलित कर कायद्यांच्या अनुसार कर लागू होतील.
#मासिक पद्धतीसाठी, 3 महिन्यांपर्यंतचे प्रीमियम एकत्र भरावे. इलेक्ट्रॉनिक क्लीअरिंग सिस्टिम (ईसीएस) द्वारे नूतनीकरण प्रीमियमचा भरावा लागेल.
लाइफ ॲश्युअर्ड’ अल्पवयीन असेल तर, पॉलिसीच्या वर्धापनाच्या दिवशी किंवा वयाची 18 वर्षे पूर्ण केल्यानंतर ताबडतोब पॉलिसी ‘लाइफ ॲश्युअर्डला आपोआप निहित केली जाईल आणि असे निहित करणे हे कंपनी आणि ‘लाइफ ॲश्युअर्ड‘ ह्यांच्यातील करार समजले जाईल.

4A/ver1/12/24/WEB/ MAR

*कर लाभ:
कर लाभ हे प्राप्‍तिकर कायद्याच्या अनुसार आहेत आणि ते वेळोवेळी बदलणे सापेक्ष आहे. तपशिलांसाठी तुमच्या कर सल्लागाराबरोबर सल्लामसलत करा.
भारतातील प्रचलित प्राप्तिकर कायद्यांच्या अनुसार आपण कर लाभासाठी/त्यातून वगळले जाण्यासाठी पात्र ठरता, असे कायदे वेळोवेळी बदलू शकतात. अधिक तपशीलांसाठी आपण आमच्या वेबसाइटला इथे भेट देऊ शकता.