SBI Life - Smart Lifetime Saver | One of the best Lifetime Saver In India
SBI Logo

Join Us

Tool Free 1800 22 9090

एसबीआय लाइफ - स्मार्ट लाइफटाइम सेव्हर

UIN: 111N136V02

Product Code: 2Z

play icon play icon
SBI Life Smart Lifetime Saver with Return of Premium

तुमच्या कुटुंबाला आजीवन उत्पन्नासह
अपग्रेड मिळवून द्या

 
एक इंडिविज्युअल, नॉन-लिंक्ड, पार्टिसिपेटिंग (PAR) होल लाइफ इन्शुरन्स, सेव्हिंग्ज प्रॉडक्ट आहे.

जीवनात तुम्ही जसजशी प्रगती करता, तुमची स्वप्ने आणि जबाबदाऱ्या तुमच्या सोबत वाढत जातात. तेव्हा, पुढे जे काही सामोरे येणार आहे, त्यासाठी आर्थिकदृष्ट्या तुम्ही नेहमीच तयार रहा, एसबीआय लाइफ - स्मार्ट लाइफटाइम सेव्हर ह्या प्लॅनने, जो तुम्हाला उत्पन्नाची आणि संरक्षणाची गॅरंटी देतो, संपूर्ण आयुष्यभर.

ठळक लाभ :
  • वयाच्या 100 वर्षांपर्यंत लाइफ इन्शुरन्स कव्हर
  • आजीवन ॲन्युअल सर्व्हायवल इन्कम*
  • दोन ऑप्शनल रायडर्ससह वाढीव संरक्षण
 

*सर्व्हायवल इन्कममध्ये गॅरंटीड सर्व्हायवल इन्कम आणि घोषित केले असल्यास नॉन-गॅरंटीड सर्व्हायवल इन्कम (कॅश बोनस) ह्यांचा अंतर्भाव होतो. गॅरंटीड सर्व्हायवल इन्कम हे प्रीमियम पेमेंट टर्म (PPT)च्या अखेरीपासून आणि घोषित केले असल्यास नॉन-गॅरंटीड सर्व्हायवल इन्कम (कॅश बोनस) पॉलिसीच्या 7व्या वर्षाच्या अखेरीपासून मृत्यू/मुदतपूर्ती/सरंडर ह्यापैकी जे काही आधी घडेल तोपर्यंत देय राहील, ज्यासाठी सर्व देय प्रीमियम भरलेले असणे गरजेचे आहे.

ठळक वैशिष्ट्ये

SBI Life - Smart Lifetime Saver with Return of Premium

एसबीआय लाइफ - स्मार्ट लाइफटाइम सेव्हर

plan profile

Ali, a 33-year-old working professional, has ensured his family’s financial independence. And if life goes as planned, he has the added benefit of knowing he can receive a 100% return of premiums.

Fill in the form field to see how you too can benefit from this plan.

Name(Assured):

DOB(Assured):

Gender(Assured):

Male Female Third Gender

Discount:

Staff Non Staff

Let's finalize the policy duration you are comfortable with...

Policy Term

5 100

Premium Paying Term


A little information about the premium options...

Premium Frequency

Premium Amount

30,000 No Limit

Sum Assured

300000 No limit

SBI Life - Accidental Benefit Rider (UIN:111B041V01)

Term For ADB Rider

5

PPT for ADB Rider

ADB Rider Sum Assured

50,000 2,00,00,000

Term For APPD Rider

5

PPT for APPD Rider

APPD Rider Sum Assured

50,000 1,50,00,000

Reset
sum assured

Sum Assured


premium frequency

Premium frequency

Premium amount


premium paying

Premium Payment Term


policy term

Policy Term


maturity benefits

Maturity Benefit

At assumed rate of returns** @ 4%


or
@ 8%

Give a Missed Call

वैशिष्ट्ये

  1. 1. सुरक्षा : वयाच्या 100व्या वर्षापर्यंत.
  2. 2. गॅरंटीड सर्व्हायवल इन्कम# प्रीमियम पेमेंट टर्मच्या अखेरीपासून सुरू.
  3. 3. ॲडिशनल नॉन-गॅरंटीड सर्व्हायवल इन्कम (कॅश बोनस), जाहीर झाल्यास, पॉलिसीच्या 7व्या वर्षाच्या अखेरीपासून.
  4. 4.परिवर्तनशीलता, सर्व्हायवल बोनस संचयित करण्यासाठी.
  5. 5. लिमिटेड प्रीमियम पेमेंट टर्म : 3 प्रीमियम पेमेंट टर्म्समधून निवडीसाठी वाव : 10, 12 आणि 15 वर्षे.
  6. 6. मॅच्युरिटी बेनिफिट : एक रकमी मॅच्युरिटी बेनिफिट पॉलिसीमध्ये देय असलेल्या एकूण वार्षिकीकृत प्रीमियम्स## एवढा आहे.
  7. 7. वाढीव सुरक्षा दोन वैकल्पिक रायडर्ससह.
  8. 8. कर लाभ* : प्राप्तिकर अधिनियम, 1961 अंतर्गत प्रचलित मानदंडांच्या अनुसार.
 

*भारतातील लागू असलेल्या प्राप्तिकर कायद्यांच्या अनुसार तुम्ही प्राप्तिकर लाभांसाठी पात्र ठरू शकता, जे वेळोवेळी बदलू शकतात. तुम्हाला असे सुचवण्यात येते की पॉलिसीमध्ये लागू असणाऱ्या कर लाभांबाबत तुमच्या टॅक्स ॲडवायजरचा सल्ला घ्यावा.
#गॅरंटीड सर्व्हायवल इन्कम हे प्रीमियम पेमेंट टर्म्स आणि ॲन्युअलाइझ्ड प्रीमियम बँड्ससोबत वेगळे असेल.
##वार्षिकीकृत प्रीमियम हा एका वर्षामध्ये देय असलेल्या प्रीमियमची रक्कम असेल, ज्यातून लागू कर, एक्स्ट्रा प्रीमियम्स अंडररायटिंग, रायडर प्रीमियम आणि मॉडेल प्रीमियम्ससाठीची लोडिंग्ज वगळली जातील.

फायदे

सुरक्षा

  • तुम्ही 100 वर्षांचे होईपर्यंत एका लाइफ कव्हरद्वारे संरक्षण.
 

परिवर्तनशीलता

  • तुमच्या जीवनातील लक्ष्यांच्या अनुसार गॅरंटीड सर्व्हायवल इन्कम आणि/किंवा जाहीर केला असल्यास नॉन-गॅरंटीड सर्व्हायवल इन्कम (कॅश बोनस) लांबणीवर टाकणे किंवा संचयित करणे, ह्यासाठीच्या पर्यायासह नियोजन करा.
 

साधेपणा

  • एका साध्या अर्ज प्रक्रियेसह आणि विना-अडथळा जारी करण्यासह सहज खरेदी करा.
 

विश्वसनीयता

  • जीवनभरासाठी सर्व्हायवल इन्कम्स आणि ऑटो कव्हर पीरियडमध्ये अखंड लाइफ कव्हर मिळवा.

सर्व्हायवल इन्कम:

 
  • गॅरंटीड सर्व्हायवल इन्कम:
    1. क) जीवन आश्वासित केलेली व्यक्ती हयात असल्यानंतर आणि सर्व देय प्रीमियम्स भरलेले असल्यास, प्रीमियम पेमेंट मुदतीच्या अखेरच्या वर्षापासून समर्पण, निधन किंवा मुदतपूर्ती ह्यातील जे काही आधी होईल तोपर्यंत, प्रत्येक पॉलिसी वर्षाच्या अखेरीला हे दिले जाईल.
    2. ख) गॅरंटीड सर्व्हायवल इन्कम हे गॅरंटीड इन्कम दर गुणिले बेसिक सम ॲश्युअर्ड एवढे आहे.
  • नॉन-गॅरंटीड सर्व्हायवल इन्कम (कॅश बोनस):
    1. क) जीवन आश्वासित केलेली व्यक्ती हयात असल्यास आणि सर्व देय प्रीमियम्स भरलेले असल्यास, पॉलिसीच्या 7व्या वर्षाच्या अखेरीपासून समर्पण, निधन किंवा मुदतपूर्ती ह्यातील जे काही आधी होईल तोपर्यंत, प्रत्येक पॉलिसी वर्षाच्या अखेरीला गॅरंटीड सर्व्हायवल इन्कमसह हे दिले जाईल.
    2. ख) नॉन-गॅरंटीड सर्व्हायवल(कॅश बोनस) इन्कम जाहीर केला असल्यास, कॅश बोनस दर, गुणिले बेसिक सम ॲश्युअर्ड एवढा असतो.
 

सर्व्हायवल इन्कम्स संचयित करण्यासाठी परिवर्तनशीलता:


गॅरंटीड सर्व्हायवल इन्कम आणि/किंवा जाहीर केला असल्यास नॉन-गॅरंटीड सर्व्हायवल इन्कम (कॅश बोनस) लांबणीवर टाकणे किंवा संचयित करणे, ह्यासाठीचा पर्याय. ही संचयित विलंबित सर्व्हायवल इन्कम्स पॉलिसीधारकाला, पॉलिसीच्या मुदतीमध्ये सर्व्हायवल इन्कमच्या विलंबानंतर कोणत्याही वेळी किंवा जीवन आश्वासित केलेच्या व्यक्तीचे निधन/समर्पण/मुदतपूर्तीनंतर पॉलिसीधारकाने विनंती केल्यास देय असलेल्या व्याजासह एकरकमी देय रहातील.
विलंबित सर्व्हायवल इन्कमच्या संचयासाठी लागू असलेला व्याजाचा दर हा आरबीआय रेपो रेट वजा ज्या वर्षात संचयित रक्कम देय असेल, त्या वित्तीय वर्षाच्या 1 एप्रिल रोजी 100 बेसिस पॉइंट्स एवढा असेल. सध्या, हा रेपो रेट 1 एप्रिल 2024 रोजी द.सा. 6.50% आहे आणि म्हणून 2024-25 वितीय वर्षासाठी लागू असलेला व्याज दर, वार्षिक चक्रवाढीने द.सा. 5.50% आहे.
 

मॅच्युरिटी बेनिफिट :


जीवन आश्वासित केलेली व्यक्ती पॉलिसीच्या अखेरीपर्यंत जिवंत राहिल्यास खालील पैसे एकरकमी देय असतील:

  1. क) गॅरंटीड सम ॲश्युअर्ड ऑन मॅच्युरिटी^ अधिक जाहीर केला असल्यास टर्मिनल बोनस.
  2. ख) ह्याशिवाय, काही असल्यास, संचयित विलंबित सर्व्हायवल इन्कम दिले जाईल.
  3. ग) पॉलिसीच्या मुदतपूर्तीच्या नंतर, पॉलिसी खंडित केली जाईल आणि त्यापुढचे कोणतेही लाभ देय नसतील.
 

^गॅरंटीड सम ॲश्युअर्ड ऑन मॅच्युरिटीची व्याख्या पॉलिसीमध्ये देय असणारे एकूण ॲन्युअलाझ्ड प्रीमियम्स अशी आहे.

डेथ बेनिफिट :


जीवन ॲश्युअर केलेल्या व्यक्तीचे पॉलिसीच्या मुदतीमध्ये दुर्दैवाने निधन झाल्यास नामनिर्देशित व्यक्तीला किंवा कायदेशीर वारसाला खालील रक्कम दिली जाईल :
 
  1. क) क किंवा ख, ह्यातील जास्त रक्कम, जिथे :
    1. क. सम ॲश्युअर्ड ऑन डेथ; + काही असल्यास गॅरंटीड सर्व्हायवल इन्कम*, + जाहीर केला असल्यास आंतरिम नॉन-गॅरंटीड सर्व्हायवल इन्कम# (आंतरिम कॅश बोनस) + जाहीर केला असल्यास, टर्मिनल बोनस.
    2. ख. निधन झाल्याच्या तारखेपर्यंत भरलेल्या एकूण प्रीमियम्सच्या 105%.
  2. ख) त्याशिवाय, काही असल्यास, संचयित डिफर्ड सर्व्हायवल इन्कम, दिले जाईल.
 

*गॅरंटीड सर्व्हायवल इन्कम आणि इंटेरिम नॉन-गॅरंटीड सर्व्हायवल इन्कम ज्या वर्षामध्ये निधन झाले त्यासाठी लागू आहे.

#इंटेरिम नॉन-गॅरंटीड सर्व्हायवल इन्कम, हे जाहीर केला असल्यास, इंटेरिम कॅश बोनस दर, गुणिले बेसिक सम ॲश्युअर्ड एवढे असते.

भरलेले एकूण प्रीमियम्स म्हणजे उघडपणे गोळा केलेले कोणतेही अतिरिक्त प्रीमियम आणि कर वगळता, बेस प्रॉडक्टमध्ये भरलेले एकूण प्रीमियम्स.

सम ॲश्युअर्ड ऑन डेथ ही डेथ बेनिफिट मल्टीपल (DBM) गुणिले ॲन्युअलाइझ्ड प्रीमियम एवढी असते. DBM हा जीवन ॲश्युअर केलेल्या व्यक्तीच्या प्रवेशाच्या वयानुसार असतो.

 

कमी प्रीमियम भरलेल्या पॉलिसीमध्ये ‘‘ऑटो-कव्हर पीरियड’’ पुढीलप्रमाणे असेल :

  1. 1. पॉलिसीची किमान पहिली दोन संपूर्ण वर्षे परंतु पॉलिसीच्या पाच पूर्ण वर्षांपेक्षा कमी काळ प्रीमियम्स भरलेले असतील आणि आनुषंगिक कोणताही प्रीमियम रीतसर भरलेला नसेल तर : पहिल्या न भरलेल्या प्रीमियच्या देय तारखेपासून एक वर्षाचा ऑटो-कव्हर पीरियड उपलब्ध असेल.
  2. 2. किमान पाच पूर्ण वर्षांचे प्रीमियम्स भरलेले असतील आणि आनुषंगिक प्रीमियम रीतसर भरलेला नसेल तर : पहिल्या न भरलेल्या प्रीमियच्या देय तारखेपासून दोन वर्षांचा ऑटो-कव्हर पीरियड उपलब्ध असेल.

रायडर लाभ : अधिक माहितीसाठी रायडर ब्रोशर वाचा.

एसबीआय लाइफ - स्मार्ट लाइफटाइम सेव्हरच्या अटी आणि शर्तींच्या जोखीम घटकावरील अधिक तपशीलांसाठी, खालील दस्तऐवज काळजीपूर्वक वाचा.

SBI Life Smart Lifetime Saver Premium Details
**वयासंबंधीचे सर्व संदर्भ हे मागील वाढदिवसाला असलेल्या वयाचे आहेत.
##वार्षिकीकृत प्रीमियम हा एका वर्षामध्ये देय असलेल्या प्रीमियमची रक्कम असेल, ज्यातून लागू कर, एक्स्ट्रा प्रीमियम्स अंडररायटिंग, रायडर प्रीमियम आणि मॉडेल प्रीमियम्ससाठीची लोडिंग्ज वगळली जातील.

2Z/ver1/09/24/WEB/MAR

रायडर्स, अटी आणि शर्तीं ह्यांच्या अधिक तपशीलांसाठी, कृपया रायडर माहितीपत्रक वाचा.

^^कर लाभ:
कर लाभ हे प्राप्‍तिकर कायद्याच्या अनुसार आहेत आणि ते वेळोवेळी बदलणे सापेक्ष आहे. तपशिलांसाठी तुमच्या कर सल्लागाराबरोबर सल्लामसलत करा.
तुम्ही भारतातील कर कायद्याच्या अनुसार प्राप्तिकरातील लाभ/सवलतींसाठी पात्र आहात, जे कायदे वेळोवेळी बदलू शकतात. अधिक तपशीलांसाठी, येथे क्लिक करा.