एक इंडिविज्युअल, युनिट-लिंक्ड, नॉन-पार्टिसिपेटिंग, लाइफ इन्शुरन्स, सेव्हिंग्ज उत्पादन
SBI Logo

Join Us

Tool Free 1800 22 9090

एसबीआय लाइफ - ईवेल्थ प्लस

UIN: 111L147V01

Product Code: 3R

play icon play icon
SBI life eWealth Plus - ULIP Plans

साध्या मार्गाने तुमच्या
संपत्तीमध्ये वाढ
घडवणारा एक प्लॅन.

Calculate Premium
एक इंडिविज्युअल, युनिट-लिंक्ड, नॉन-पार्टिसिपेटिंग, लाइफ इन्शुरन्स, सेव्हिंग्ज उत्पादन
युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्रॉडक्ट्स हे कराराच्या पहिल्या पाच वर्षांमध्ये कोणतीही रोखीकरण सुलभता देऊ करत नाहीत. पॉलिसीधारक पाचव्या वर्षाच्या अखेरीपर्यंत युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्रॉडक्ट्समध्ये गुंतवलेले पैसे पूर्णपणे वा अंशत: सरंडर करू वा काढू शकत नाहीत.

खरेदी करण्याची किचकट प्रक्रिया तुम्हाला युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन्समध्ये खरेदी करण्यापासून परावृत्त करते आहे का?

आता तुम्ही एका सोप्या केलेल्या 3 टप्प्याच्या ऑनलाइन खरेदी प्रक्रियेसह युलिपच्या लाभांचा आनंद मिळवू शकता. एसबीआय लाइफ - ईवेल्थ प्लस तुम्हाला न केवळ तुमच्या कुटुंबाचे भवितव्य सुरक्षित करायला मदत करतो तर तुमची संपत्तीही वाढवतो.
हा वेल्थ प्लॅन तुम्हाला देतो -
  • सुरक्षा - आकस्मिक काही घडल्यास तुमच्या कुटुंबाच्या गरजांसाठी विमाछत्र
  • परवडणारा - प्रीमियम्स प्रति महिना रु.3000 पासून सुरू
  • लवचिकता - दोन इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजीजमधून निवड करण्याची
  • साधेपणा - सहजपणे ऑनलाइन अर्ज करा
  • तरलता – 6व्या पॉलिसी वर्षापासून अंशत: पैसे काढता येतात

केवळ काही क्लिक्सनी इन्शुरन्स आणि संपत्ती निर्मितीकडे काही पावलं टाका.

ठळक वैशिष्ट्ये

SBI Life eWealth Plus Premium Details

non-participating Online Unit Linked Insurance plan

Buy Now

वैशिष्ट्ये

  • जीवन विमाछत्र
  • गुंतवणुकीच्या दोन स्ट्रॅटेजीजमधून निवडीसाठी वाव - ग्रोथ स्ट्रॅटेजी आणि ॲक्टिव स्ट्रॅटेजी
  • ग्रोथ स्ट्रॅटेजीमध्ये पूर्व - निर्धारित टक्केवारीत ऑटोमॅटिक ॲसेट ॲलोकेशन फीचर
  • ॲक्टिव स्ट्रॅटेजीमधील बारा युनिट फंड्समधून तुमचे स्वत:चे फंड ॲलोकेशन निवडा
  • सोपी केलेली 3 टप्प्यांची ऑनलाइन खरेदी प्रक्रिया
  • कोणत्याही प्रीमियम ॲलोकेशन चार्जशिवाय नाममात्र प्रीमियम पेमेंट्स
  • 6व्या पॉलिसी वर्षापासून अंशत: पैसे काढण्याची सुविधा

फायदे

सुरक्षा

  • आकस्मिक काही घडले असता तुमच्या कुटुंबाचे आर्थिक स्वातंत्र्य अबाधित राहील ह्याची खात्री करून घ्या
  • मार्केटमधील चढउतारांना सामोरे जाण्यासाठी तुमच्या फंड्स आपोआप पुनर्संतुलित होतात

लवचीकता

  • तुमच्या जोखीम-क्षमतेच्या अनुसार तुमच्या पसंतीच्या इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजीमध्ये गुंतवणूक करा

साधेपणा

  • खरेदीची विना-व्यत्यय ऑनलाइन प्रक्रिया

परवडण्याची क्षमता

  • कोणत्याही प्रीमियम चार्जेस शिवाय रु.3,000 इतक्या कमी प्रीमियमसह

लिक्विडीटी

  • कोणत्याही अनपेक्षित खर्चांसाठी अंशत: रक्कम काढण्याचे स्वातंत्र्य मिळवा

कर लाभांचा आनंद घ्या*

योजनेचे लाभ

मॅच्युरिटी बेनिफिट (फक्त कार्यान्वित पॉलिसींसाठीच लागू) :

पॉलिसीची मुदत पूर्ण झाल्यानंतर, फंड व्हॅल्यूची रक्कम देण्यात येईल.

 

डेथ बेनिफिट (मृत्यू लाभ) (फक्त कार्यान्वित पॉलिसींसाठीच लागू) :

कंपनीला डेथ क्लेम मिळाल्याच्या तारखेला (कंपनीला डेथ क्लेमच्या सूचनेच्या तारखेला असलेली फंड व्हॅल्यू किंवा सम ॲश्युअर्ड वजा#लागू असणार्‍या अंशतः काढलेल्या रकमा किंवा निधनाच्या तारखेपर्यंत भरलेल्या एकूण प्रीमियम्सच्या^ 105%) ह्यातील जास्त असणारी रक्कम लाभार्थीला देय राहील.

#लागू असणार्‍या अंशतः काढलेल्या रक्कमा म्हणजे, लाइफ ॲश्युअर केलेल्या व्यक्तीच्या निधनाच्या आधीच्या 2 वर्षांमध्ये काढलेल्या ज्या काही अंशतः रक्कमा असतील त्या होय.
^भरलेले एकूण प्रीमियम्स म्हणजे बेस प्रॉडक्टमध्ये, काही असल्यास, टॉप-अप्स प्रीमियमसह, मिळालेल्या सर्व प्रीमियम्सची एकूण रक्कम.

एसबीआय लाइफ - ईवेल्थ प्लसच्या जोखमीच्या घटकांचे अधिक तपशील, अटी आणि शर्ती जाणून घेण्यासाठी, खालील दस्तऐवज काळजीपूर्वक वाचा.
SBI Life eWealth Premium Details
#वयासंबंधीचे सर्व संदर्भ हे मागील वाढदिवसाचे वय आहेत.
^ॲन्युअलाइझ्ड प्रीमियम म्हणजे कर, रायडर प्रीमियम्स आणि काही असल्यास रायडर्स वरील अतिरिक्त प्रीमियम अंडररायटिंग वगळता एका वर्षामध्ये देय असलेली प्रीमियमची रक्कम.

टीप :
लाइफ ॲश्युअर केलेली व्यक्ती जर अल्पवयीन असेल तर, पॉलिसीची मुदत योग्य प्रकारे निवडायला हवी, ज्यामुळे लाइफ ॲश्युअर केलेली व्यक्ती मुदतपूर्तीच्या तारखेला किमान सज्ञान असेल.

3R/ver1/09/24/WEB/MAR

**परताव्याचे प्रती वर्ष @4% आणि @8% हे दर हे सर्व लागू चार्जेस विचारात घेतल्यानंतर, फक्त समजावून सांगण्याच्या हेतूने आहेत. ह्यांची हमी देण्यात येत नाही आणि ते परताव्याची सर्वात अधिक किंवा कमी मर्यादाही नव्हेत. युनिट लिंक्ड लाइफ इन्शुरन्स उत्पादने ही मार्केटच्या जोखमींच्या आधीन आहेत. या करारांअंतर्गत देऊ करण्यात येणारे विविध फंड ही फंडांची नावे असून ती ह्या प्लॅन्सचा दर्जा, त्यांची भावी वाटचाल आणि उत्पन्ने ह्यांचे कोणत्याही प्रकारे निर्देशन करीत नाहीत.

‘फंड मॅनेजमेंट चार्जेस’ असे विविध चार्जेस कापून घेतलेले आहेत. मॉर्टेलिटी चार्जेस वगळता सर्व चार्जेस हे प्रचलित रेग्युलेशन्सच्या अनुसार सुधारणा सापेक्ष आहेत. चार्जेस आणि त्यांचे कामकाज, ह्यांच्या संपूर्ण माहितीसाठी कृपया विक्री माहिती पुस्तिका वाचा.

युनिट लिंक्ड लाइफ इन्शुरन्स उत्पादने ही पारंपरिक लाइफ इन्शुरन्स उत्पादनांपेक्षा वेगळी आहेत आणि मार्केट जोखमीच्या आधीन आहेत. युनिट लिंक्ड लाइफ इन्शुरन्स पॉलिसीमध्ये भरणा करण्यात येणारे प्रीमियम भांडवली बाजाराशी निगडित गुंतवणुकीच्या जोखमींशी संबंधित असतात आणि फंडाची कामगिरी व भांडवली बाजारावर परिणाम करणार्‍या घटकांच्या आधारावर युनिट्सचे एनएव्ही मूल्य कमी किंवा अधिक होऊ शकते. आणि विमा घेणारी व्यक्ती त्याच्या/तिच्या निर्णयांसाठी जबाबदार राहील. एसबीआय लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड हे इन्शुरन्स कंपनीचे फक्त नाव आहे आणि एसबीआय लाइफ - ईवेल्थ प्लस हे युनिट लिंक्ड लाइफ इन्शुरन्सचे फक्त नाव असून काँट्रॅक्टचा दर्जा, त्याची भावी वाटचाल किंवा उत्पन्ने ह्यांचे ती कोणत्याही प्रकारे निर्देशन करीत नाहीत. तुमच्या विमा सल्लागाराबरोबर किंवा मध्यस्थ किंवा इन्शुरन्सच्या पॉलिसी दस्तावेजाद्वारा संबंधित जोखमी आणि लागू आकार यांची माहिती करून घ्या. या उत्पादनांत अंतर्गत देऊ करण्यात येणारे विविध फंड ही फंडांची नावे असून ती ह्या प्लॅन्सचा दर्जा, त्यांची भावी वाटचाल आणि उत्पन्ने ह्यांचे कोणत्याही प्रकारे निर्देशन करीत नाहीत. फंड पर्यायाची गतकालीन कामगिरी ही भावी कामगिरी निर्देशीत करत नाही. ह्या पॉलिसीच्या अंतर्गत देय असणारे सर्व लाभ हे कर कायद्यांच्या आणि वेळोवेळी करण्यात येणाऱ्या अन्य कायद्यांच्या आधीन आहेत, तपशीलांसाठी आपल्या कर सल्लागारासोबत सल्लामसलत करा.

विक्री व्यवहार पूर्ण करण्यापूर्वी जोखमीचे घटक, अटी आणि शर्तीं यांच्या अधिक तपशिलांसाठी कृपया विक्री माहिती पुस्तिका काळजीपूर्वक वाचा.

*कर लाभ :
कराचे लाभ आयकर कायद्यानुसार आहेत आणि ते वेळोवेळी बदलू शकतात. अधिक तपशीलांसाठी कृपया आपल्या कर सल्लागाराचा सल्ला घ्या. तपशीलांसाठी कृपया तुमच्या कर सल्लागाराबरोबर सल्लामसलत करा.
आपण वेळोवेळी बदलणार्‍या अधीन असलेल्या, भारतातील लागू असलेल्या आयकर कायद्यानुसार प्राप्तिकर लाभ / सूट मिळविण्यासाठी पात्र आहात. अधिक माहितीसाठी आपण आमच्या वेबसाइटला येथे भेट देऊ शकता.