एसबीआय लाइफ फ्लेक्सी स्मार्ट प्लस - व्हेरीएबल / परिवर्तनशील जीवन विमा पॉलिसी
SBI Logo

Join Us

Tool Free 1800 22 9090

एसबीआय जीवन- फ्लेक्झी स्मार्ट प्लस

UIN: 111N093V01

Product Code: 1M

null

आश्वस्त, समृद्धी आणि सुरक्षितता.

  • दोन प्लॅन पर्याय
  • संपत्ती निर्मिती
  • अंशिक पैसे काढणे
  • आश्वस्त रक्कम आणि पॉलिसी मुदत बदलण्याचा पर्याय
ही योजना कंत्राटाच्या पहिल्या पाच वर्षांमध्ये कोणतीही तरलता देऊ करत नाही. 5 व्या पॉलिसी वर्षाच्या समाप्तीपर्यंत या प्लॅनमध्ये गुंतवलेले पैसे पूर्णपणे किंवा अंशिकरित्या काढण्यात पॉलिसीधारक सक्षम असणार नाही.

आपल्याकडे जीवनातील बदल स्वीकारण्यासाठी पुरेशी लवचिकता प्रदान करणारा एखादा लाइफ इन्शुरन्स प्लॅन आहे काय?


एसबीआय लाइफ – फ्लेक्झी स्मार्ट प्लस आपल्याला आपल्या कायम-बदलत्या गरजांनुसार आपल्या इन्शुरन्स प्लॅनमध्ये सुधारणा करण्यास परवानगी देतो. हा आपली बचत वाढण्यास मदत करण्यासाठी नियमित बोनस व्याजाची देखील ऑफर करतो.

प्लॅन हे ऑफर करतो -
  • सुरक्षितता – आपल्या कुटुंबाचे वित्तीय संरक्षण सुनिश्चित करणे
  • विश्वसनीयता – प्रचलित पॉलिसीकरिता खात्रीशीर किमान बोनस व्याज दर.
  • लवचिकता – आपल्या बदलत्या गरजांनुसार आपली पॉलिसी मुदत आणि आश्वस्त रक्कम समायोजित करा
  • तरलता –6व्या पॉलिसी वर्षापासून कोणतेही आकस्मिक खर्च पूर्ण करण्यासाठी अंशिक पैसे काढणे

खाली दिलेले आमचे लाभ इलस्ट्रेटर वापरून पहा आणि आपले भविष्य आर्थिकदृष्ट्या आपण सुरक्षित कसे करू शकता हे पहा.

हायलाइट्स

null

वैयक्तिक, सहभाग, परिवर्तनशील इन्शुरन्स उत्पादन

वैशिष्ट्ये

  • दोन प्लॅन पर्यायांमध्ये निवड करा
  • प्रचलित पॉलिसीसाठी, संपूर्ण टर्ममध्ये, 1.00% वार्षिक दराने खात्रीशीर किमान बोनस व्याज
  • आपली आश्वस्त रक्कम सुधारित करा आणि आपली पॉलिसी मुदत वाढवा
  • 6व्या पॉलिसी वर्षापासून अंशिक पैसे काढण्याचा आनंद घ्या

लाभ

सुरक्षितता

  • दोन प्लॅन पर्याय – गोल्ड आणि प्लॅटिनम, आपल्या कुटुंबाच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्याला लाइफ कव्हरसह प्रदान करण्यासाठी

विश्वसनीयता

  • वर्षानुवर्षे आपला निधी तयार करा आणि आपल्या आर्थिक स्वप्नांची पूर्तता करा

लवचिकता

  • आपल्या बदलत्या गरजांनुसार आश्वस्त रक्कम वाढवा किंवा कमी करा
  • आपण निवडलेली पॉलिसी मुदत वाढविण्यासाठी पर्यायासह आपल्या निधीमध्ये वाढ करा

तरलता

  • कोणत्याही अनपेक्षित खर्चांना तोंड देण्यासाठी 6 व्या पॉलिसी वर्षापासून अंशिक पैसे काढण्यास परवानगी

कर लाभांचा आनंद घ्या*

मृत्यूच्या प्रसंगात

आश्वस्त जीवनाच्या मृत्यूच्या दुर्दैवी प्रसंगात, लाभार्थ्यास पुढील लाभ मिळेल:

गोल्ड पर्यायासाठी: पॉलिसी खाते मूल्य$ किंवा आश्वस्त रक्कम^ / पेड अप आश्वस्त रक्कम^ यांमधील अधिक किंवा मृत्यू दाव्याच्या सूचनेच्या तारखेपर्यंत भरलेल्या एकूण प्रीमियमच्या 105%.

^आश्वस्त रक्कम, मृत्यूसमयी 60 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्यांसाठी मागील 2 वर्षांमध्ये काढलेल्या अंशतः रकमांच्या मर्यादेपर्यंत असेल आणि मृत्यूसमयी 60 वर्षे किंवा अधिक वय असलेल्यांसाठी 58 वर्षांपासून काढलेल्या सर्व अंशतः रक्कमांच्या मर्यादेपर्यंत.

प्लॅटिनम पर्यायासाठी: पॉलिसी खाते मूल्य आणि आश्वस्त रक्कम^ यांपैकी जे जास्त असेल ते/पेड-अप आश्वस्त रक्कम^ जशी लागू असेल तशी किंवा मृत्यूच्या दाव्याच्या सूचनेच्या तारखेला भरलेल्या एकूण प्रीमियमच्या 105%.

जीवंत असताना

परिपक्वता लाभ: परिपक्वतेवेळी, पॉलिसीधारकास पॉलिसी खात्याचे मूल्य, समाप्ती बोनस व्याज दर असल्यास त्याच्या समावेशासह, परिपक्वतेच्या दिनांकारोजी मोजल्याप्रमाणे मिळण्याचा अधिकार असेल आणि परिपक्वतेवेळी एकरकमी देय असेल.

$पॉलिसी खाते मूल्य

पॉलिसी खाते हे आपल्या मालकीच्या निधीचे मूल्य दर्शविते. भरलेले प्रीमियम, पॉलिसीखालील सर्व प्रीमियम वाटप शुल्काची एकूण, ज्यावर खाली दिल्याप्रमाणे बेरजा क्रेडिट केल्या जातात, पॉलिसी खात्यामध्ये क्रेडिट केले जातात. इतर सर्व शुल्क पॉलिसी खात्याच्या मूल्यामधून वसूल केले जातात. आपल्या दिलेल्या सर्व काढलेल्या रकमा, पेआउट इत्यादी देखील आपल्या पॉलिसी खात्यामधून वजा केले जातील.

पॉलिसी खात्यावर खाली दिल्याप्रमाणे विविध बेरजा लावल्या जातील -

  • प्रचलित पॉलिसींसाठी पूर्ण टर्मकरिता उत्पादनाचा हमी दिलेला किमान बोनस व्याज दर हा 1.00% प्रति वर्ष आहे
  • त्याला जोडून, दर आर्थिक वर्षाच्या अखेरीस मालमत्ता आणि उत्तरदायित्वांच्या स्थितिक मूल्यांकनातून निघणार्याल नफ्याच्या आधारे शून्य नसणारा धन नियमित बोनस व्याज दर जाहीर केला जाईल.
  • अंतरिम बोनस व्याज दर प्रत्येक आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस जाहीर केला जाईल जो त्या आर्थिक वर्षामध्ये बाहेर पडणार्या् पॉलिसींसाठी लागू होईल. वर्षाच्या अखेरिस घोषित केलेला नियमित बोनस व्याज दर हा अंतरिम बोनस व्याज दरापेक्षा कमी नसेल.
  • पॉलिसीतून बाहेर पडतेवेळी (परिपक्वता/मृत्यू/परत करणे), समाप्ती बोनस व्याज दर दिला जाऊ शकेल.

करामध्ये लाभ*

आपण भारतातील लागू आयकर कायद्यांनुसार आयकर लाभ/सवलतींसाठी पात्र आहात ज्या वेळोवेळी झालेल्या बदलांच्या अधीन आहेत. अधिक तपशीलांसाठी आपण आमच्या वेबसाइटला भेट देऊ शकता: http://www.sbilife.co.in/sbilife/content/21_3672#5. तपशीलांसाठी कृपया आपल्या कर सल्लागाराचा सल्ला घ्या.

एसबीआय लाइफ – फ्लेक्झी स्मार्ट प्लस च्या जोखीम घटक, अटी आणि शर्तींवरील अधिक तपशीलांसाठी, खालील दस्तऐवज काळजीपूर्वक वाचा.
null
^वयाचे सर्व संदर्भ शेवटच्या वाढदिवशी असलेल्या वयाचे आहेत.
## मासिक पद्धतीसाठी, 3 महिन्यांचा प्रीमियम आगाऊ भरावा लागेल आणि नूतनीकरण प्रीमियम केवळ ईलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग प्रणाली (ECS), क्रेडिट कार्ड, डायरेक्ट डेबिट आणि SI - EFT द्वारेच स्वीकारला जाईल.

1M.ver.04-10/17 WEB MAR

**अनुक्रमे @4% आणि @8% हे अध्याहृत दर हे सर्व लागू चार्जेस विचारात घेतल्यानंतर ह्या दरांनी हे केवळ खुलासा करणारे नमुने आहेत. बोनस दर हे बोनस संचय होण्याच्या कालावधीमध्ये सतत समान अध्याहृत धरलेले आहेत, तर प्रत्यक्ष बोनस हा कंपनीच्या गुंतवणुकीच्या अनुभवाच्या अनुषंगाने वेगळा असू शकतो. (ह्यांची हमी देण्यात येत नाही आणि ते उत्पन्नाची सर्वात अधिक किंवा कमी मर्यादाही नव्हेत). उत्पन्ने ही गुंतवणुकीच्या भावी कामगिरीसह अनेक घटकांवर अवलंबून आहेत.

कृपया विक्री पूर्ण करण्यारपूर्वी जोखीम घटक, अटी आणि शर्तींवरील अधिक तपशीलांसाठी विक्री माहिती पुस्तक काळजी पूर्वक वाचा.

*कर लाभ:
कर लाभ हे आयकर नियमांनुसार आहेत आणि ते वेळेप्रमाणे बदलाच्या अधीन आहेत. कृपया तपशीलांसाठी आपल्या कर सल्लागाराचा सल्ला घ्या.
प्रत्येक उत्पादन पृष्ठायवर योजना लाभांखाली एक आणखी कर अस्वीकरण आहे. वेळेप्रमाणे बदलाच्या अधीन असलेल्या भारतातील लागू असलेल्या आयकर नियमांनुसार आपण आयकर लाभ/सूट साठी पात्र आहात. आपण आणखी तपशीलांसाठी आमच्या वेबसाइटला भेट देऊ शकता . कृपया तपशीलांसाठी आपल्या कर सल्लागाराचा सल्ला घ्या.