एक इंडिविज्युअल, नॉन-लिंक्ड, पार्टिसिपेटिंग, लाइफ इन्शुरन्स सेव्हिंग्ज प्रॉडक्ट
तुमचे जीवन, एक पालक म्हणून, तुमचे मूल आणि त्यांच्या वाटचालीतील महत्त्वाचे टप्पे जसे की शिक्षण, व्यावसायिक पदव्या, लग्न, उद्योगाची स्वप्ने आणि अशाच आणखीही गोष्टींच्या सभोवती फिरत असते. तुमच्या मुलाची स्वप्ने आणि आकांक्षा ह्यांना अग्रक्रम देण्यासाठी, तुम्ही योग्य वेळी सुज्ञपणे नियोजन सुरू करणे गरजेचे असते, ज्यामुळे त्यांचे सक्षमीकरण होण्यासाठी अत्यंत गरजेचा असा निधी उपलब्ध होऊ शकतो.
एसबीआय लाइफमध्ये आम्हाला ह्याची कल्पना आहे आणि म्हणून तुमच्यासाठी आम्ही सादर केला आहे एसबीआय लाइफ - स्मार्ट फ्यूचर स्टार, हे एक इंडिविज्युअल, नॉन-लिंक्ड, पार्टिसिपेटिंग, लाइफ इन्शुरन्स सेव्हिंग्ज प्रॉडक्ट. हे प्रॉडक्ट तुमच्या सेव्हिंग्जला उभारी देण्यासाठी बोनसेस आणि तुमच्या मुलाचे आर्थिक भविष्य सुरक्षित करण्यासाठी एकरकमी मुदतपूर्तीची रक्कम पुरवते. तर इन-बिल्ट वेव्हर ऑफ प्रीमियममुळे तुम्हाला मानसिक शांती लाभते, तसेच तुमच्या मुलाच्या गरजा आणि महत्त्वाकांक्षांना साजेसे प्लॅन कस्टमाइज करण्यासाठी परिवर्तनशीलता मिळते, ज्यामुळे तुमचे मूल त्यांच्या भविष्याचे खरेखुरे स्टार बनू शकते.