नवीन जॉब ???mr.user.selcrs???
SBI Life Insurance English | हिन्दी | বংলা | தமிழ் | తెలుగు | मराठी | ગુજરાતી | ಕನ್ನಡ | ਪੰਜਾਬੀ | മലയാളം
टोल फ्री कॉल करा 1800 22 9090 56161 वर 'CELEBRATE' एसएमएस करा
यावर आम्हाला शोधा:   Twitter  Facebook
   
ग्राहक शिक्षण
होम > null > जीवनातील घटना आणि टप्पे > नवीन जॉब

जीवनातील घटना आणि टप्पे

 
परिचय
नवीन जॉब सुरु करणे उत्साहवर्धक असते, आपल्याला नवीन जीवनशैली, जाण्‍यायेण्‍याचा नवीन मार्ग, कामाचे नवीन वातावरण, नवीन सहकारी, वरिष्‍ठ तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे कामाच्या ठिकाणी नव्या जबाबदार्‍या स्वीकाराव्‍या लागतात.
त्याहीपेक्षा जास्त म्हणजे, आपल्याला आपल्या नवीन नियुक्ती लाभांशी काही तडजोडी कराव्या लागतात; कदाचित आपल्या मागील नोकरीमध्‍ये फक्त आपल्याला विमाछत्र देणारी हेल्‍थ इन्‍शुरन्‍स पॉलिसी असू शकते. आता आपल्याला आपण आणि आपल्या कुटुंबाला विमाछत्र देणारी एक विस्‍तृत हेल्‍थ इन्‍शुरन्‍स पॉलिसी, एक ग्रुप इन्‍शुरन्‍स पॉलिसी किंवा अपंगत्त्व विमा दिला जाऊ शकतो. तथापि, हे खरे लाभ आहेत याची आपल्याला खात्री नसते किंवा कदाचित कमी वेळेत आपल्याला तात्त्काळ निर्णय घ्‍यावे लागू शकतात. आपल्याला निर्णय घेण्‍यात मदत करण्‍यासाठी आपल्या विचाराकरीता येथे काही गोष्‍टी दिल्या आहेत.

लाइफ इन्‍शुरन्‍स आणि नवीन जॉब
लाइफ इन्‍शुरन्‍स पॉलिसी असण्‍याच्या उद्देशांपैकी मुख्‍य उद्देश म्हणजे आपल्याला आणि आपल्या प्रिय ‍व्यक्तींना आर्थिक सुरक्षा प्रदान करणे. आपण कुटुंबात एकमेव कमावती व्यक्ती असल्‍यास, आर्थिक नियोजन आणखी महत्त्वाचे बनते. लाइफ इन्‍शुरन्‍स संरक्षण आणि आर्थिक सुरक्षा देण्‍याचा दुहेरी हेतू साध्‍य करतो.

मला ग्रुप लाइफ इन्‍शुरन्‍स पॉलिसीचे विमाछत्र आहे.
ग्रुप लाइफ इन्‍शुरन्‍स हा इन्‍शुरन्‍स कंपनी आणि नियोक्त्यादरम्यान झालेल्‍या कराराद्वारे कर्मचार्‍यांच्या ग्रुपला इन्‍शुरन्‍स प्रदान करतो. वैयक्तिक आधारावर उपलब्ध असणार्‍या लाइफ इन्‍शुरन्‍सप्रमाणेच हा असतो, पण बहुतांश कंपन्या त्यांच्या कर्मचार्‍यांना मुदती लाइफ पॉलिसीद्वारे विमाछत्र देतात.
सामान्यत: आपल्याला कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय कंपनी आपल्या पगाराच्या एक किंवा दुप्पट रकमेची कमीत कमी लाइफ इन्‍शुरन्‍स रक्कम देते.

याचा अर्थ मी आता माझी वैयक्तिक पॉलिसी बंद करायला हवी काय?
आपल्याला ग्रुप इन्‍शुरन्‍स पॉलिसीचे विमाछत्र असतानाच, तरीही आपण वैयक्तिक लाइफ इन्‍शुरन्‍स पॉलिसीची गरज ओळखली पाहिजे. नवीन लाइफ इन्‍शुरन्‍स पॉलिसीचा आपला प्रीमियम केवळ नंतर जास्त जसेल; जेव्हा आपल्याला आपल्या कंपनीकडून कव्हर मिळणार नाही (खर्च कपातीचा भाग म्हणून) किंवा आपण नवीन नोकरी शोधत असाल तेव्हा. या‍अतिरिक्त, बचतीचे साधन म्हणून आपण आपली वैयक्तिक लाइफ इन्‍शुरन्‍स पॉलिसी वापरण्‍याचा प्रयत्न करु शकता.

माझी कंपनी/नियोक्ता मला विमाछत्र देत नाही
आपला नवीन नियोक्ता ग्रुप लाइफ इन्‍शुरन्‍स देत नसेल तर; आपण इन्‍शुरन्‍सची गरज ओळखून एक वैयक्तिक पॉलिसी विकत घेण्‍याचा विचार केला पाहिजे.
आपल्यावर ‍आर्थिकदृष्‍ट्या अवलंबून असणारे कुटुंब असल्यास, लाइफ इन्‍शुरन्‍स असणे अत्यंत महत्त्वाचे ठरु शकते. नवीन नोकरी सुरु करणे म्हणजे आपल्या इन्‍शुरन्‍सच्या गरजा नवीन असू शकतात. उदाहरणार्थ, आपले उत्पन्न वाढल्यास, आपले वार्षिक उत्पन्न आणि आपली कव्हरेज रक्कम यात सातत्यपूर्ण संबंध राखण्‍यासाठी आपल्याला आपला इन्‍शुरन्‍स वाढविण्‍याची गरज पडू शकते. पण आपल्या निर्णयाचा परिणाम म्हणून यापैकी कोणतेही घटक बदलल्यास, आपण स्‍वत:ला आणि आपल्या प्रिय व्यक्तीना संरक्षण देण्‍यासाठी पावले उचलणे आवश्‍यक आहे.
 
पॉलिसी ऑनलाइन खरेदी करा
  लॉगिन क्षेत्र
  Go
   NAVs
  नवीनतम युनिट व्हॅल्यू आणि न्यूजलेटर पहाण्यासाठी येथे क्लिक करा >>
  टूल्स अँड प्लॅनर्स
  प्रीमियम कॅल्क्युलेटर
  इन्‍शुरन्‍स कॅल्क्युलेटर
  टॅक्‍स कॅल्क्युलेटर
  चाइल्ड एजुकेशन प्लानर
  रिटायरमेंट कैल्क्युलेटर
SBI | SBI Online Banking | SBI General Insurance | SBI Card | SBI AMC | SBI Capital | SBI Global Factors | SBI DFHI Ltd
IRDAI | IRDAI द्वारा ग्राहक शिक्षण वेबसाइट | लाइफ इन्शुरन्स काउन्सिल | SFIN कोड | गोपनीयता धोरण | अस्वीकरण | कॉल करू नका
विमा ही आग्रहाची विषयवस्तू आहे. IRDAI नोंदणी क्र. 111, 29 मार्च 2001 रोजी जारी.
नोंदणीकृत आणि कॉर्पोरेट कार्यालय: एसबीआय लाइफ इन्‍शुरन्‍स कं.लि., नटराज, एम.व्ही. रोड आणि वेस्टर्न एक्सप्रेस हायवे जंक्‍शन, अंधे‍री (पूर्व), मुंबई-400 069.
सदरहू वेबसाइट ही ग्राहकांच्या सोयीसाठी इंग्रजीवरुन भाषांतरित करण्यात आली आहे. कोणत्याही शब्दामध्ये/विधानामध्ये अजाणता काही फरक/विसंगती राहून गेली असल्यास इंग्रजी संहिता ग्राह्य धरण्यात येईल.
CIN: U99999MH2000PLC129113
2014 एसबीआय लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड. सर्व अधिकार राखीव