एसबीआय लाइफ - प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना ???mr.user.selcrs???
SBI Life Insurance English | हिन्दी | বংলা | தமிழ் | తెలుగు | मराठी | ગુજરાતી | ಕನ್ನಡ | ਪੰਜਾਬੀ | മലയാളം
टोल फ्री कॉल करा 1800 22 9090 56161 वर 'CELEBRATE' एसएमएस करा
यावर आम्हाला शोधा:   Twitter  Facebook
   
ग्रु्प प्लॅन
कॉर्पोरेट सोल्युशन्स
ग्रुप लोन प्रोटेक्‍शन उत्पादने
ग्रुप मायक्रो इन्शुरन्स प्लॅन
होम > कॉर्पोरेट सोल्युशन्स > ग्रुप प्रोटेक्शन प्लॅन > एसबीआय लाइफ - प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना

एसबीआय लाइफ - प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना
(UIN : 111G102V01)

 फेरफार विनंती अर्ज | दावा (क्लेम) अर्ज | दाव्याची प्रक्रिया | दावा (क्लेम) ई-मेल | पॉलिसी सर्व्हिसिंग ई-मेल

कस्टमर्सनी/ग्राहकांनी कृपया ह्याची दखल घ्यावी की भाषांतरित मजकुरात काही त्रुटी/विवादास्पद आढळल्यास इंग्रजी मजकूरातील कथित अर्थ आणि हेतू ग्राह्य धरले जातील.
परिचय
ठळक वैशिष्ट्ये

प्लॅन एका दृष्टिक्षेपात
लाभ
पॉलिसी दस्तैवज
 
  
परिचय :
 
हे एक नॉन-लिंक्ड, नॉन-पार्टिसिपेटिंग, वार्षिक नूतनीकरण करता येणारे ग्रुप टर्म इन्शुरन्स प्रॉडक्ट आहे याची रचना भारत सरकारच्या ‘‘प्रधानमंत्री जीवन ज्योती बिमा योजनेच्या (पीएमजेजेबीवाय) पूर्ततेसाठी करण्यात आली आहे. या योजनेची अंमलबजावणी बँकांद्वारे केली जाईल आणि भारत सरकार वेळोवेळी योजनेचे जे नियम निर्दिष्‍ट करेल त्या अधिन राहिल.

ह्या योजनेअंतर्गत मिळणारे विमाछत्र हे सदरहू योजनेमध्ये दाखल होण्यासाठी विमा काढलेल्या व्यक्‍तीच्या खात्यातून प्रीमियम वजा (डेबिट) झाल्याच्या तारखेपासून सुरू होईल.
 

ठळक वैशिष्ट्ये:
 
परवडणार्‍या किंमतीत सुरक्षा
 
तात्काळ प्रोसेसिंग - मेडिकल तपासणीची गरज नाही
 
सुलभ नोंदणी : अत्यंत सोप्या अशा प्रस्ताव पत्राच्या आधारित नोंदणी
 

प्लॅन एका दृष्टिक्षेपात:
 
प्रवेशाचे वय किमान : 18 वर्षे (मागच्या वाढदिवशीचे वय) 
कमाल : 50 वर्षे (नजीकच्या वाढदिवशीचे वय)
मुदतपूर्तीचे कमाल वय 55 वर्षे (नजीकच्या वाढदिवशीचे वय)
पॉलिसीची मुदत एक वर्ष नूतनीकरण करण्या सापेक्षा
सम अॅश्युअर्ड (विमा राशी) रु. 2,00,000 (दोन लाख फक्‍त)
प्रीमियमची रक्कम रु. 330/- (सर्विस टॅक्स वगळता* आणि सहभागी बँकांच्या प्रशासकीय चार्जेस रु.41/- अंतर्भूत धरून)
लीन कालावधी योजनेमध्ये नावनोंदणी झाल्याच्या तारखेपासून 45 दिवस (प्रवेशाची तारीख/विमा छत्राच्या सुरुवातीची तारीख)
*प्रचलित कर कायद्यांच्या तरतुदीनुसार केंद्र आणि / किंवा राज्य सरकार वेळोवेळी अधिसूचित करतील त्यानुसार तुमच्या प्रीमियम्सवर सर्विस टॅक्स/सेस/जीएसटी (सध्या फक्‍त जम्मू आणि कश्मीर रहिवाशांच्या बाबतीत) आणि/किंवा अन्य कोणतीही वैद्यानिक लेव्ही/ड्यूटी/ सरचार्ज लागू होतील.
 

लाभ:
 
डेथ बेनिफिट (मृत्यू लाभ) :
विमाछत्राच्या कालावधी दरम्यान विमा काढलेल्या व्यक्‍तीचे दुर्दैवाने निधन झाल्यास, सम अॅश्युअर्ड (विमा राशी) चुकती केली जाईल.

सदस्याला जरी एकापेक्षा जास्त बँक खाती किंवा एकापेक्षा जास्त इन्शुरर्स द्वारा विमाछत्र लाभलं असेल तरीही प्रधानमंत्री जीवन ज्योती बिमा योजनेच्या अंतर्गत मृत्यू लाभ रु.200,000 पेक्षा अधिक नसेल. अशा प्रसंगी, दाव्याची रक्कम पहिल्या अर्जास देय राहील आणि आनुषंगिक विमाछत्रांवरील प्रीमियम रद्दबातल होतील.
 
मॅच्युरिटी/सरेंडर बेनिफिट:
ह्या प्लॅनमध्ये कोणताही मुदतपूर्ती/समर्पण लाभ नाही.
 
एन्रोलमेंट (नोंदणी) :
विमाछत्राची सुरुवात होण्याची तारीख ही सदरहू योजनेमध्ये दाखल होण्यासाठी विमा काढलेल्या व्यक्‍तीच्या खात्यातून प्रीमियम डेबिट झाल्याची तारीख असेल आणि विमा छत्र हे आनुषंगिक वर्षाच्या 31 मे पर्यंत असेल. त्यानंतर, तुमच्या बँकेच्या खात्यातून प्रीमियमची रक्कम डेबिट करून दर वर्षी 1 जूनला विमाछत्राचं नूतनीकरण करता येईल. ही प्रीमियमची रक्कम भारत सरकार वेळोवळी करेल त्यानुसार बदलांच्या सापेक्ष आहे. .

सदस्यांना जर 1 जूननंतर योजनेमध्ये दाखल व्हायची इच्छा असेल तर तो/ती संपूर्ण वर्षभराचा प्रीमियम भरून आणि योजनेच्या नियमांद्वारा निर्दिष्‍ट असे जे काही आवश्यक असतील ते दस्तऐवज/निवेदने दाखल करून तसं करू शकतात. एन्‍रोलमेंटचे (नोंदणीचे) नियम भारत सरकारद्वारे वेळोवेळी निर्दिष्‍ट केल्याच्या अनुसार असतील.
 
वगळलेल्या गोष्टी :
स्कीममध्ये नव्याने एन्‍रोल (नोंदणी) केलेल्या सदस्यांसाठी स्कीममध्ये एन्‍रोलमेंट (नोंदणी) केल्याच्या तारखेपासून पहिल्या 45 दिवसांमध्ये विमाछत्र लाभणार नाही (लीन कालावधी) आणि ’लीन कालावधी’ मध्ये (अपघाताखेरीज अन्य कारणांमुळे) निधन झाल्यास, कोणताही दावा करण्याला अनुमती नाही..
 
टॅक्स बेनिफिट्स (कर लाभ) : :
टॅक्स बेनिफिट्स (कर लाभ)/सूट ह्या गोष्‍टी भारतातील लागू असलेल्या प्रचलित कर कायद्याच्या अनुसार आहेत, जे वेळोवेळी बदलू शकतात. तपशीलवार माहितीसाठी कृपया तुमच्या टॅक्स अॅडवायजरचा सल्‍ला घ्या.
 
 
ही प्लॅनची केवळ संक्षिप्‍त वैशिष्ट्ये आहेत. विक्री व्यवहार पूर्ण करण्यापूर्वी जोखमीचे घटक, अटी आणि शर्तीं ह्यांच्या अधिक तपशीलांसाठी कृपया सेल्स ब्रोशर काळजीपूर्वक वाचा.
 
76.ver.03-08/16 WEB MAR
बनावट फोन कॉल्स आणि खोट्याै/लफंग्या ऑफर्स पासून सावधान. IRDAI नागरीकांना स्पष्टी‍करण देत आहे की : • IRDAI किंवा त्यांचे अधिकारी विमा तसेच वित्तीय उत्पादने यांची विक्री किंवा प्रीमियमची गुंतवणूक अशा कृतींमध्ये सहभागी होत नाहीत. • IRDAI कोणताही बोनस जाहीर करत नाही. तेव्हा, असे कॉल्स येणार्या. नागरीकांना विनंती आहे की त्यांनी फोन कॉल, नंबर अशा तपशीलांसह पोलिसांकडे तक्रार दाखल करावी.
 
पॉलिसी ऑनलाइन खरेदी करा
  लॉगिन क्षेत्र
  Go
   NAVs
  नवीनतम युनिट व्हॅल्यू आणि न्यूजलेटर पहाण्यासाठी येथे क्लिक करा >>
  टूल्स अँड प्लॅनर्स
  प्रीमियम कॅल्क्युलेटर
  इन्‍शुरन्‍स कॅल्क्युलेटर
  टॅक्‍स कॅल्क्युलेटर
  चाइल्ड एजुकेशन प्लानर
  रिटायरमेंट कैल्क्युलेटर
SBI | SBI Online Banking | SBI General Insurance | SBI Card | SBI AMC | SBI Capital | SBI Global Factors | SBI DFHI Ltd
IRDAI | IRDAI द्वारा ग्राहक शिक्षण वेबसाइट | लाइफ इन्शुरन्स काउन्सिल | SFIN कोड | गोपनीयता धोरण | अस्वीकरण | कॉल करू नका
विमा ही आग्रहाची विषयवस्तू आहे. IRDAI नोंदणी क्र. 111, 29 मार्च 2001 रोजी जारी.
नोंदणीकृत आणि कॉर्पोरेट कार्यालय: एसबीआय लाइफ इन्‍शुरन्‍स कं.लि., नटराज, एम.व्ही. रोड आणि वेस्टर्न एक्सप्रेस हायवे जंक्‍शन, अंधे‍री (पूर्व), मुंबई-400 069.
सदरहू वेबसाइट ही ग्राहकांच्या सोयीसाठी इंग्रजीवरुन भाषांतरित करण्यात आली आहे. कोणत्याही शब्दामध्ये/विधानामध्ये अजाणता काही फरक/विसंगती राहून गेली असल्यास इंग्रजी संहिता ग्राह्य धरण्यात येईल.
CIN: U99999MH2000PLC129113
2014 एसबीआय लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड. सर्व अधिकार राखीव