मुंबई, 28 सप्टेबर 2011 - आघाडीची खासगी इन्शुरर एसबीआय लाइफने जगभरातील मिलीयन डॉलर राऊंड टेबल (एमडीआरटी) 2011 मध्ये आघाडीवर राहून भारतातील एकमेव इन्शुअर राहण्याचा बहुमान कायम राखला आहे. सतत तिसर्या वर्षात, एसबीआय लाइफ 2011 मध्ये 2,661 एमडीआरटी सदस्य असल्याने आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठेच्या लीगमध्ये पोहोचली आहे. यापैकी 200 सदस्यांनी, कोर्ट ऑफ टेबल (कॉट) आणि 20 सदस्यांनी टॉप ऑफ टेबल (टॉट) सदस्यता स्थिती प्राप्त केली आहे. गेल्या पाच वर्षांपासून एसबीआय लाइफ सतत जगभरातील आघाडीच्या पाच इन्शुररमध्ये स्थान टिकवून आहे. जागतिक स्तरावर कंपनी 2007 मध्ये 5 व्या, 2008 मध्ये 3 र्या, 2009, 2010 आणि 2011 मध्ये पहिल्या श्रेणीत राहिली आहे.
एमडीआरटी ब्रॅण्डशी संबंधीत असणारी ख्याती, विक्री सर्वोत्तमतेचे मानक आणि सर्वोच्च तात्त्विक मानके ही काही महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत. एमडीआरटी सदस्यता हा एकमेव सन्मान असून तो जगातील 1 टक्क्यापेक्षाही कमी इन्शुरन्स आणि आर्थिक सल्लागारांना प्राप्त होतो. लाइफ इन्शुरन्स व्यावसायिक एमडीआरटी सदस्य बनण्याचा सन्मान मिळवण्याचा प्रयत्न करतात.
| |
| श्रेणी |
कंपनीचे नाव |
देश |
2010 सदस्य |
| 1 |
एसबीआय लाइफ इन्शुरन्स |
भारत |
2,661 |
| 2 |
न्यूयॉर्क लाइफ |
यूएसए |
2,067 |
| 3 |
सॅमसंग लाइफ इन्शुरन्स |
रिपब्लिकन ऑफ कोरिया |
2,052 |
| 4 |
एलआयसी ऑफ इंडिया |
भारत |
1,993 |
| 5 |
नॉर्थवेस्टर्न म्युच्युअल |
यूएसए |
1,260 |
| 13 |
एचडीएफसी स्टॅण्डर्ड लाइफ |
भारत |
489 |
| 21 |
आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल लाइफ |
भारत |
341 |
| 31 |
टाटा एआयजी लाइफ |
भारत |
207 |
| 33 |
मॅक्स न्यूयॉर्क लाइफ |
भारत |
203 |
|
श्री. एम.एन. राव, एमडी आणि सीइओ, एसबीआय लाइफ म्हणाले की, ''जगभरात एजंट आणि बँकेतील इन्शुरन्स सुविधादाते हे व्यक्तीगत आर्थिक सल्ल्यासाठी पुढेही विश्वासार्ह स्रोत मानले जातील.'' जागतिक स्तरावर आम्हाला मिळालेल्या यशामुळे आमच्या वितरकांनी पाळलेल्या व्यावसायिक दृष्टीकोनावर शिक्कामोर्तब होते. आमच्या ग्राहकांना सल्लागारी-आधारित लाइफ इन्शुरन्स दिला जाण्यासाठी आम्ही त्यांना संबंधीत पाठबळ देण्यावर लक्ष केंद्रीत करणे चालू ठेऊ.''
श्री. राजीव गुप्ता, कार्यकारी संचालक, विपणन, एसबीआय लाइफ यांनी सांगितले की, ''या यशातून आमची गुणवत्तापूर्ण सल्लागार तयार करण्याची कटीबद्धता प्रतिबिंबीत होते ज्यांना जागतिक दर्जाचे बेंचमार्क म्हणून ओळखले जाईल.'' गरज आधारीत उपाय, व्यावसायिक सल्ला आणि अजोड सेवा देणे हे आमच्या सल्लागारांसाठी मुख्य मुद्दे असतील.''
देशातील सर्वात विश्वासार्ह ब्रॅण्डचे प्रतिनिधीत्त्व करण्याची संधी, सर्वोच्च प्रशिक्षण कार्यक्रम आणि आकर्षक प्रतिफल तसेच सन्मान कार्यक्रम हे एसबीआय लाइफ इन्शुरन्स सल्लागारांना मिळणारे काही फायदे आहेत.
श्री. आनंद पेजावार, कार्यकारी संचालक, विपणन, एसबीआय लाइफ यांनी म्हटले की, ''सर्वोच्च उत्पादक रिटेल एजन्सी चॅनल असण्याव्यतिरिक्त, आमच्या एकात्मिक बँकअॅश्युरन्समुळे आमच्या बँकेचे ग्राहक आणि आमच्या उत्पादनाचे सुविधादाते यांच्याकरिता मूल्य तयार होणे सुरु रहाते. इन्शुरन्स उत्पादनांच्या विक्रीत सहभागी असणारे बँक कर्मचारी वेगाने त्यांच्या ग्राहकांना संपूर्ण बँकींग आणि इन्शुरन्स उपाय देत असून त्यातून बँक सर्व वित्तीय गरजांसाठी एक सुपरमार्केट बनत आहे.''
जून 2011 मध्ये समाप्त पहिल्या आर्थिक तिमाहीत, एसबीआय लाइफने रु. 144 कोटींचा नफा नोंदवून मागील वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत 27% टक्क्यांचा आकर्षक नफा वृद्धी गाठली. कंपनीचा एकूण प्रीमियम 13 % टक्क्यांनी वाढून या कालावधीत रु. 1935 कोटी झाला. या कालावधीत संकलीत नवीन व्यवसाय प्रीमियम रु. 892 कोटी झाला. व्यवस्थापनांतर्गत संपदा मागील वर्षातील याच कालावधीच्या तुलनेत 33% वाढून 30 जून 2011 रोजी 40, 070 कोटींवर पोचल्या. उद्योगात कंपनीचा जीडब्ल्यूपी सर्वात कमी (एकूण रिटन प्रीमियम) 10.14% टक्के राहणे कायम आहे.
अद्वितीयपणे, बाह्य स्थिती खडतर असतानाही, एसबीआय लाइफची उपस्थिती सतत वाढत राहिली आहे. चालू आर्थिक वर्षात, कंपनीने 81 शाखा सुरु केल्या असून 1657 कर्मचार्यांची भरती केली आहे.
इर्डा अहवाल जुलै 2011 नुसार एसबीआय लाइफ खासगी खेळाडूंमध्ये प्रथम क्रमांकावर आहे. खासगी लाइफ इन्शुरर्समध्ये कंपनीचा बाजारातील वाटा 21.6% तर बाजारातील एकूण वाटा 6% आहे.
एमडीआरटी विषयी: एमडीआरटी ही जगातील सर्वोत्तम लाइफ इन्शुरन्स विक्री (सल्ला) व्यावसायिकांची संघटना आहे. 1927 मध्ये स्थापन झालेली एमडीआरटी ही संघटना 76 देश आणि प्रदेश तसेच 450 कंपन्यांचे प्रतिनिधीत्त्व करणारी जगातील आघाडीच्या सुमारे 36,000 लाइफ इन्शुरन्स आणि आर्थिक सेवा व्यावसायिकांची आंतरराष्ट्रीय, स्वतंत्र संघटना आहे. एमडीआरटी सदस्यांना कुशल व्यावसायिक मानण्यात येते जे उद्योगातील सर्वोत्तम, उल्लेखनीय ग्राहक सेवा देणारे आणि लाइफ इन्शुरन्स आणि आर्थिक सेवा व्यवसायात सर्वोच्च मानक विक्री सर्वोत्तमता प्राप्त केलेले लोक मानण्यात येतात.